शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नऱ्हे सरपंचाच्या पतीच्या खुन प्रकरणी माजी सरपंचासह आणखी ५ संशयित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:50 IST

ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या वादातून महिला सरंपचाच्या पतीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला़. 

पुणे : ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या वादातून महिला सरंपचाच्या पतीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला़. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून या घटनेत आणखी एका माजी सरपंचासह ५ जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़.  

 बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा. नऱ्हे ) हे व्यायामावरुन घरी परत येत असताना १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांना एका मोटारीने धडक दिली होती़.  त्यात ते गंभीर जखमी झाले होते़. त्यांची पत्नी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याने अपघाताचा बनाव रचून त्यांना धडक दिल्याचे तपासात उघड झाले होते़.  भारती विद्यापीठ पोलिसांनी अविनाश कैलास कांबळे व नितीश सतीश थोपटे या दोघांना अटक केली होती़. दरम्यान उपचार सुरु असताना रविवारी दुपारी बाळासाहेब वनशिव यांचा मृत्यु झाला़. त्यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात खुनाचा कलम वाढविले आहे़.  

या गुन्ह्याचा तपास करीत असताना अविनाश कांबळे व थोपटे यांना मोटार पुरविणारा तसेच एक माजी सरपंच यांच्यासह आणखी पाच जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे़.  या गुन्ह्यात आणखी पाच जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी सांगितले़.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून