शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: कोरोनाच्या धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:07 IST

आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते.

पुणे : आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी दिली होती. पण महाराष्ट्र आणि पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी महापालिका निवडणुक आणि मेट्रो उदघाटन या कार्यक्रमासाठी डिसेंबरअखेर पुणे दौरा निश्चित झाला होता. पण काही कारणास्तव तो एक महिना पुढे ढकलण्यात आला. पण आता संपूर्ण देशभरात कोरोर्ण रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चे रद्द करण्यात आले आहेत. 

देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळेच कालपासून संपूर्ण राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने दिले १२०० कोटी

हिंजवडी ते शिवाजीनगर हा देशातील पहिली पीपीपी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प आहे. पुण्यातील या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ न मिळाल्याने भूमिपूजन रखडले आहे. हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने १२०० कोटी रुपये दिले आहेत. या मेट्रोचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते या महिन्यात होणार होते. 

राज्यात नवी नियमावली

- राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी आणि रात्री 11 ते सकाळी  संचारबंदी - शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद - स्विमिंग पूल पूर्णपणे बंद- लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत- खासगी कार्यालयात 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी- 2 डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू - लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या