शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 8:08 PM

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही

बारामती : इंदीरा गांधी यांनी त्यांच्या काळात गरीबी हटावचा नारा दिला. मात्र, ६० ते ७० वर्ष सत्तेत राहुन त्यांना ते जमले नाही. गरिबी हटविण्यात त्यांना यश आले नाही. भ्रष्टाचार करत काॅंग्रेस पुढे जात राहिली, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काॅंग्रेसवर टीका केली.

बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आठवले बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले मोठे घोडेस्वार आहेत. मोदी यांचा घोडा अडविण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडुन होत आहे. मात्र, राहुन गांधी यांच्यात तेवढी ताकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास त्यांना तुडवत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असा टोला आठवले यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले,आम्ही गरीब आहोत, पण आम्ही इमानदार आहोत. ज्यांच्याशी नाते जोडतो, त्यांना आम्ही धोका देत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मान राखुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी एकनिष्ठ राहुन आम्ही महाराष्ट्रात राजकारण केल्याचे आठवले म्हणाले. उध्दव ठाकरे यांचा थयथयाट चाललेला आहे. संजय राऊत आज उलटसुलट भाषा वापरतात. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, असे ते म्हणतात. मात्र, आम्ही कोणाचा पक्ष फोडलेला नाही. एकनाथ शिंदे त्यांचे आमदार घेऊन आमच्याकडे आले. उध्दव ठाकरे आम्हाला सोडुन काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर गेले, ती गध्दारी नव्हती का, तुम्ही असे करणे अपेक्षित नव्हते, असा सवाल यावेळी आठवले यांनी केला. अगोदर ठाकरे यांनी गध्दारी केली. भाजपच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याचे आठवले म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती...भीमशक्तीची भुमिका मांडली. त्याला आम्ही पाठींबा दिला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. ठाकरे आमच्यासोबत असते तर धनुष्यबाण कोणी हिरावुन घेवु शकले नसते. त्यांच्या ५४ आमदारांपैकी पैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. बहुमत त्यांच्याकडे असल्याने चिन्ह त्यांना मिळाले, हा कायदा असल्याचे आठवले म्हणाले. अजित पवार देखील ४२ आमदार घेऊन आले. कोणाला भीती दाखविण्याची आवश्यकता नव्हती. पवार यांच्या मनात भाजपसमवेत जायचे होते, असे देखील आठवले यांनी सांगितले.

भाषणात आठवलेंच्या कविता 

१)बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार साहेबांचा साथी.. पण  आता मी आहे अजितदादांचा साथी...त्यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडुन आणण्यासाठी आलेलो आहे बारामती...नरेंद्र मोदींनी वाढविली विकासाची गती...म्हणुन बारामतीत विजयी होणार महायुती.

२)लढाइ आहे पवार विरुध्द पवारआमच्या वहिनीच होणार आहे लोकसभेवर संवार.

३) हम तो नही करते बात बडी बडीलेकीन चुनकर आनेवाली है सुनेत्रा पवार की घडी.

टॅग्स :Puneपुणेbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारRamdas Athawaleरामदास आठवले