नारायणगावला कुस्त्यांच्या आखाड्याचा बोजवारा

By Admin | Updated: April 29, 2017 03:45 IST2017-04-29T03:45:31+5:302017-04-29T03:45:31+5:30

कुस्त्यांच्या आखाड्यात राजकीय आखाडा झाल्याने आखाड्याचा बोजबारा उडाला. यात्रा कमिटीच्या ढिसाळ नियोजनामुळे

Narayangaon yuga yang akada badgeara | नारायणगावला कुस्त्यांच्या आखाड्याचा बोजवारा

नारायणगावला कुस्त्यांच्या आखाड्याचा बोजवारा

नारायणगाव : कुस्त्यांच्या आखाड्यात राजकीय आखाडा झाल्याने आखाड्याचा बोजबारा उडाला. यात्रा कमिटीच्या ढिसाळ नियोजनामुळे नारायणगाव येथील कुस्त्यांचा प्रसिद्ध असलेला आखाडा उरकता घ्यावा लागला. आखाड्याचा बोजवारा उडाल्याने ग्रामस्थ, कुस्तीशौकिन व विशेषकरून लांबून आलेले नामवंत पैलवान यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
उत्तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मुक्ताबाई देवी व काळोबादेव यात्रेनिमित्त या यात्रेत कुस्त्यांचा आखाडा प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या आखाड्यात नामवंत पैलवान येतात.
या वर्षी कुस्त्यांचा आखाडा सुरू असताना भेट देण्यासाठी येणारे राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते, विविध पदाधिकारी यांचा फेटे बांधून मानसन्मान सुरू झाल्याने आखाड्यात पैलवान कमी व नेते, कार्यकर्ते जास्त असे चित्र होते. कुस्त्यांना जागा कमी तर राजकीय व्यक्तींचा आखाडा या वेळी दिसून येत होता.
कुस्त्या लावताना जागा कमी पडत असल्याने पैलवान हतबल झाले. यात्रा कमिटीमध्ये दोन गट असल्याने दोनही गट मानसन्मान करण्यात गुंग झाले होते. आखाड्यात जागा कमी पडत असताना आलेले मान्यवर व कार्यकर्त्यांनी आखाड्यातून बाहेर जायचे कोण, असा प्रश्न पडला होता. राजकीय नेत्याच्या सन्मानात गुंग झाला होता. त्
यातच यात्रा कमिटीमध्ये कुस्ती लावणे व पंच यांना कुस्त्या लावताना या गर्दीचा वारंवार त्रास होत होता. सूत्रसंचालन करणारे माईकवरून आखाड्यातून गर्दी कमी करण्याच्या सूचना देत होते. परंतु त्या सूचनेकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. आखाड्यात गर्दी झाल्याने दोन वेळा आखाडा बंद करण्यात आला होता.
कुस्ती पाहण्यासाठी आलेले कुस्तीशौकीन, ग्रामस्थांनी संयोजकांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सत्कार करून मान्यवरांना बाहेर बसवा, आम्ही कुस्त्या पाहण्यासाठी आलो आहेत. कुणाचे सत्कार पाहण्यासाठी नाहीत, असे सांगूनही यात्रा कमिटी व कुस्ती कमिटी गर्दी कमी करण्यास व कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना बाहेर काढण्यात असमर्थ राहिले.
कुस्ती सुरू असताना पंच व कुस्ती आखाडा कमिटीचे सदस्य सोडून अनेक जण या आखाड्यात उभे राहून फिरत असल्याने बसलेल्या कुस्तीशौकिनांना कुस्ती पाहण्यासाठी व्यत्यय होत असल्याने त्यांनी मातीचे ढेकळे फेकून मारली.

Web Title: Narayangaon yuga yang akada badgeara