शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाचा विस्तार करताना नारायण राणे यांचा विचार : रावसाहेब दानवे यांचे पुण्यात वक्तव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 18:23 IST

एनडीएच्या विस्ताराप्रसंगी नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

ठळक मुद्देलोकसभा आणि विधानसभेचा ५ वर्ष कार्यकाळ भाजपा पूर्ण करेल : रावसाहेब दानवेनाना पटोले यांची चौकशी करून कारवाई करण्याचे दानवे यांचे संकेत

पुणे : मंत्रिपदाच्या आश्वासनावर भाजमध्ये दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषद अथवा मंत्रिपदाचे कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नसून एनडीएच्या विस्ताराप्रसंगी त्यांचा मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांच्या एका रिक्त जागेसाठी आज अर्ज भरण्यात आला. यावेळी नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारत भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना जाहीर केली. यामुळे राणे नाराज झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तर रावसाहेब दानवे हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.लवकरच मध्यवधी निवडणुका होणार असे शिवसेना या मित्र पक्षाकडून सांगितले जात आहे. या प्रश्नावर रावसाहेब दानवे म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभेचा ५ वर्ष कार्यकाळ भाजपा पूर्ण करेल, तसेच मध्यावधी निवडणुकांचा त्याचा अंदाज असेल अशा शब्दात शिवसेनेचे हे आरोप फेटाळून त्यांनी लावले. राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीची रक्कम मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, की काही ठिकाणी  शेतकऱ्यांना रक्कम राहिली असेल, मात्र या महिन्या अखेरपर्यंत सर्व शेतकरी कर्ज माफीचे लाभार्थी होतील. मागील महिन्याभरापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि नाना पटोले हे भाजपाविरोधात विधान करीत आहेत. त्यांच्याविषयी पक्ष काय भूमिका घेणार या प्रश्नाबाबत ते म्हणाले, की यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या बाबत मी काही बोलणार नाही. तर नाना पटोले यांच्या विधाना बाबत तूर्तास तरी कारवाई नाही. मात्र पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाPuneपुणे