शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी माफी मागणार नाहीत; काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, गिरीश बापटांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:19 IST

वक्तव्याच्या निषेधार्थ मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही काँग्रेसकडून केली जात आहे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत 'महाराष्ट्र काँग्रेसने देशात कोरोना पसरवला' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काँग्रेसकडून संपूर्ण महाराष्ट्रात  आंदोलन करण्यात आले. वक्तव्याच्या निषेधार्थ मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही काँग्रेसकडून केली गेली. त्याच वक्तव्याच्या निषेधार्थ अजूनही ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. आजही पुण्यात चक्क खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी नरेंद्र मोदींचा धिक्कार असो, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यांनतर गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं वाटत असेल. तर ते कधीच माफी मागणार नाहीत. काँग्रेसनेच देशाची माफी मागावी. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

बापट म्हणाले,  काँग्रेस आज माझ्या घरासमोर निदर्शन केली. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं वाटत असेल. तर ते कधीच माफी मागणार नाहीत. कारण कोरोना काळात जो पक्ष आणि राज्य जे राजकारण खेळलं ते निंदनीय आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिली. ट्रेन सोडल्या लसीकरण केलं. पण ज्या पद्धतीत काँग्रेसने मुंबई मध्ये कामगारांच्या मनात भीती बसवली. त्यांना रेल्वे स्टेशन वर एकत्र केलं आणि कोरोना पसरवला. म्हणून काँग्रेसनेच देशाची माफी मागावी. आता भारताची जी प्रगती होत आहे. ती मागच्या 70 वर्षात कधी झाली नाही. म्हणून काँग्रेसने मोदीजींचे आभार मानले पाहिजे. 

भ्रष्टाचारी लोकांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही 

किरीट सोमय्या सत्काराच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या आवारात गोंधळ घातला. त्यावेळी पुणे पोलिसांनाही त्यांना शांत करता आलं नाही. त्यामुळे पुणे पोलिसांकडून भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर बोलताना बापट म्हणाले,  भाजपचे 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. कारण हे आमचं व्यक्तिगत काम नाही. आम्ही समाजासाठी काम करत असतो. भाजप कोरोनाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी काम करता आहे. त्या लोकांना आम्ही आत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही बापट यांनी यावेळी दिला आहे.  

टॅग्स :girish bapatगिरीष बापटNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस