शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

पळालेल्या मुलीने अनुभवल्या नरकयातना, अल्पवयीन बालिकेची करुण कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:23 IST

अनाथ असलेली ‘ती’ अवघ्या अकरा वर्षांची... तिला दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुखवस्तू कुटुंबाने दत्तक घेतले... सर्व काही उत्तम चाललेले असतानाच अचानक ती ‘गायब’ झाली

पुणे : अनाथ असलेली ‘ती’ अवघ्या अकरा वर्षांची... तिला दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुखवस्तू कुटुंबाने दत्तक घेतले... सर्व काही उत्तम चाललेले असतानाच अचानक ती ‘गायब’ झाली... सर्वत्र शोधाशोध करूनही तिचा पत्ता लागला नाही... नऊ महिन्यांनंतर तिचा अचानक वडिलांच्या मोबाईलवर फोन आला... वडील पोलिसांना घेऊन मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचले... काळीज पिळवटून टाकणारी तिची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला... आपल्यावर वारंवार बलात्कार झाल्याचे सांगताच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला... मुलीला छातीशी कवटाळून त्यांनी घर गाठले...एखाद्या सिनेमाचे कथानक वाटावे, अशी ही घटना लोहमार्ग पोलिसांमुळे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील एका सुखवस्तू कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी एका मुलीला अनाथाश्रमामधून दत्तक घेतले होते. ही मुलगी त्यांच्या घरी आनंदाने राहत होती. नुकतेच तिचे वडील सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्याला दत्तक घेण्यात आल्याचे तिला माहिती होते. दत्तक मुलगी असल्यामुळेच आई-वडील सतत बोलतात, त्रास देतात असे तिला वाटत होते. जानेवारी महिन्यात तिला चूक केली, म्हणून आई-वडील ओरडले होते. रागाच्या भरात ही मुलगी १० जानेवारी रोजी कोणाला काहीही न सांगता घरामधून निघून गेली. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडून ती थेट पुण्याला आली. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी मिरज लोहमार्ग पोलिसांकडे अपहरणाची तक्रार नोंदवली. पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हिम्मतराव माने पाटील, उपनिरीक्षक एन. डी. मुन्तोडे, कर्मचारी अमरदीप साळुंके, सुरेश जाधव, संतोष चांदणे, अनिल गुंदरे, नीलेश बिडकर यांनी तातडीने पुण्यातल्या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. वर्णनावरून एकाला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीने त्याला ओळखले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे़ही मुलगी १० जानेवारीला पुणे रेल्वे स्थानकावर उतरली. दोन दिवस रेल्वे स्थानकावरच भुकेने व्याकूळ अवस्थेत फिरत राहिली. रेल्वे स्थानकावर तिला श्रीकांत नावाचा तरुण भेटला. भावनिक आधार देण्याचे नाटक करीत तो तिला येरवड्यातील भाजी मंडईशेजारील घरी घेऊन गेला. ही मुलगी दोन महिने त्याच्या घरी होती. या कालावधीत त्याने तिच्यावर पाच ते सहा वेळा बलात्कार केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर मारहाण केली जात होती. एक दिवस संधी साधत ती तेथून पळाली. रेल्वेनेच ती नाशिकला गेली. नाशिक रेल्वे स्थानकावर चार महिने राहिल्यानंतर ती मनमाडला गेली. या काळात ती भीक मागून स्वत:चे पोट भरत होती. मनमाड रेल्वे स्थानकावर ती राहत असताना तिला सचिन नावाचा मुलगा भेटला. हा मुलगा मनमाड रेल्वे स्थानकावर पाणी विकतो. त्यानेही या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.आपली चूक झाली असून आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याला हा त्रास सहन करावा लागत असल्याचे तिच्या लक्षात आले. बाहेरच्या जगाचा निर्दयी आणि निष्ठूर अनुभव तिला आला होता. सततची उपासमार, उघड्यावरचे राहणे, भीक मागून जगणे या सर्व परिस्थितीमुळे तिला आई-वडिलांची आठवण येऊ लागली. धीर करून तिने २४ सप्टेंबरला एसटीडी बुथवरून वडिलांना फोन केला. मी मनमाड रेल्वे स्थानकावर असल्याचे तिने वडिलांना सांगितले.मिरज लोहमार्ग पोलिसांना घेऊन तिचे वडील २७ सप्टेंबरला मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्या वेळी ही मुलगी फलाट क्रमांक ४ वर बसलेली मिळून आली. अंगावरचे कपडे आणि तिची अवस्था पाहून वडिलांना धक्काच बसला. शद्ब फुटत नसल्याने तिला उराशी धरले. वडिलांच्या स्पर्शाने तिच्याही अश्रूंचा बांध फुटला. आपल्यावर झालेले अत्याचार तिने वडिलांसह पोलिसांच्या महिला सहाय्य कक्ष आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर कथन केले. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो पुणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा