नानगावचे ‘सहकारी पाणी’ बंद!
By Admin | Updated: June 30, 2015 23:15 IST2015-06-30T23:15:34+5:302015-06-30T23:15:34+5:30
शेतीसाठी पाण्याचा अतिवापर होत असल्याने शासन ठिबक सिंचनाचा आग्रह धरून पाणीवाटपासाठी सहकारी संस्थांचा आग्रह धरत असतानाच दौंड तालुक्यातील नानगाव

नानगावचे ‘सहकारी पाणी’ बंद!
प्रकाश शेलार , केडगाव
शेतीसाठी पाण्याचा अतिवापर होत असल्याने शासन ठिबक सिंचनाचा आग्रह धरून पाणीवाटपासाठी सहकारी संस्थांचा आग्रह
धरत असतानाच दौंड तालुक्यातील नानगाव येथील महाराष्ट्रातील पहिली व सर्वांत मोठी सहकारी पाणीपुरवठा संस्था वीजबिल थकल्याने बंद पडली आहे.
नानगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेला ६५ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. एकूण १२०० एकर जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणणारी, ४ सर्वाधिक ८०२ सभासदसंख्या असणारी ही सर्वांत मोठी संस्था म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होती.
भीमा नदीवरून प्रत्येकी १०० हॉर्सपॉवर असणारे ३ विद्युतपंप रात्रंदिवस सर्व क्षेत्रासाठी पुरेसे होते. परंतु, या संस्थेचे सुमारे २५ लाख रुपये वीजबिल थकल्याने महावितरणने या संस्थेचा वीजपुरवठा बंद केला आहे. सदरचे वीजबिल गेल्या ५ वर्षांपासून थकले आहे.
तीन महिन्यांपूर्वी संस्थेचे वीजजोड कापल्यानंतर सभासद शेतकऱ्यांनी लाईटबिल भरण्यासाठी प्रयत्न न करता खासगी विद्युतपंप उभारून आपापल्या शेतामध्ये पाण्याची कायमची सोय केली. त्यामुळे संस्था अधिकच अडचणीत आली.
या संदर्भात संस्थेचे सचिव अशोक रसाळ म्हणाले, की सभासदांकडून थकीत पाणीपट्टी येणे ३५ लाख रुपये आहे. संस्था चालू करण्यासाठी सभासदांची मानसिकता बदलावी तसेच महावितरणने थकीत कर्जामध्ये सूट द्यावी, तरच संस्था चालू होईल.
संस्थेचे अध्यक्ष विश्वास भोसले म्हणाले, की आगामी महिन्यात सभासदांची सभा बोलावणार आहे. कार्यक्षेत्रातील काही सभासदांनी वैयक्तिक पाईपलाईन अद्यापही केलेली नाही. त्यांची पिके
वाळून चालली आहेत. त्यादृष्टीने
३०० ऐवजी १०० हॉर्सपॉवरच्या विद्युतपंप सुरू करून संस्था नव्याने चालू करणार आहे.
१९५0 मध्ये झाली होती स्थापना
संस्थेचे स्वत:चे कार्यालय व विद्युत पंपासाठी सुसज्ज यंत्रणा असणारे शेड आहे. हे शेड भीमा नदीतीरी उभारलेले आहे. विद्युत पंपाद्वारे
पाणी खेचून परिसरातील सर्व शेतीला पाईपलाईनने पाणीपुरवठा करून प्रत्येकाच्या शेतामध्ये व्हॉल्व्ह उभारलेले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विठ्ठलराव विखे पाटील राहुरी या साखर कारखान्याची स्थापना झाली. याच गोष्टीची प्रेरणा घेऊन ‘विना सहकार नहीं उद्धार’ या तत्त्वावर पुणे लोकल बोर्डाचे अध्यक्ष व नानगावचे शेतकरी सर्जेराव गुंड यांनी या संस्थेची १९५० मध्ये स्थापना केली.
या वेळी स्थानिक शेतकरी शेअर गोळा
करण्यासाठी दारोदारी फिरले, त्या वेळी काही शेतकऱ्यांनी भांडीकुंडी विकून संस्थेचे शेअर खरेदी केले. शेतकऱ्यांच्या त्यागातून व कष्टातू ही संस्था उभारली.
या संस्थेमुळे महाराष्ट्रामध्ये नानगावचे शिवार सर्व प्रथमच सुजलम्-सुफलाम् बनले. याची दखल घेऊन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रत्यक्ष नानगावला येऊन संस्थेचे कौतुक केले. त्यामुळे अल्पावधीत ही संस्था राज्यभर गाजली.