शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सेनानी नाना जोशी यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 20:36 IST

विद्यापीठ व शिक्षण क्षेत्रातील एक तडफदार आणि वादळी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती...

ठळक मुद्देविज्ञान शाखेचे अधिष्ठाता, कार्यकारिणी सदस्य,अधिसभा व विद्या परिषदेचे अधिकार मंडळ सदस्य

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे माजी सदस्य , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सेनानी एन.सी.जोशी उर्फ नाना जोशी यांचे शनिवारी पुण्यात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक वादळी व्यक्तिमत्व हरपले,अशा भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत.    विद्यापीठ व शिक्षण क्षेत्रातील एक तडफदार आणि वादळी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता, कार्यकारिणी सदस्य,अधिसभा व विद्या परिषदेचे आदी अधिकार मंडळांचे सदस्य होते. त्यांनी १९७५ ते १९९६ पर्यंत विद्यापीठात विविध पदावर काम केले. विद्यापीठातील शैक्षणिक क्षेत्रात नाना जोशी आणि सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार यांचे असे दोन गट होते. धुळे,जळगाव जिल्ह्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इतरही जिल्ह्यातील प्राध्यापकांना व संस्थाचालकांनी त्यांनी मदत केली.जोशी यांनी १९५६ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली.   डॉ. शा.ब. मुजुमदार म्हणाले,विद्यापीठ कार्यकारणीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात.त्यात नाना जोशी यांचा व माझा एक गट होता.आमच्यात वैयक्तिक मनभेद किंवा नव्हते.तर महाविद्यालयांना मान्यता देताना शैक्षणिक व प्रशासकीय पातळीवर मतभेद होते.त्यांनी अनेक प्राध्यापकांना मदत केली.तसेच ग्रामीण भागात महाविद्यालये सुरू करण्यास मदत केली.शिक्षण क्षेत्रातील एक कार्यक्षम व्यक्तिमत्व हरपले. डॉ.सुहास परचुरे म्हणाले,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुमारे पाच कुलगुरूंबरोबर त्यांनी काम केले.माझ्यासह अनेकांना नाना जोशी यांच्यामुळे विद्यापीठात अनेक वर्षे काम करता आले. सर्वांना मदत करत असल्यामुळे ‘मदतीचा राजा’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ग्रामीण भागात अनेक महाविद्यालय सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली. विद्यापीठाच्या कट्ट्यावर बसून ते अनेक कामे करत. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू आणि वादळी व्यक्तिमत्व हरपले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठDeathमृत्यू