‘काळूबाई’च्या नामाचा गजर
By Admin | Updated: January 6, 2015 23:06 IST2015-01-06T23:06:07+5:302015-01-06T23:06:07+5:30
खळद येथे काळूबाईदेवीची यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘काळूबाई’च्या नामाचा गजर
खळद : खळद येथे काळूबाईदेवीची यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अनेक भाविकांनी आपल्या नवसाची पूर्तताही केली. या वेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने दुमदुमून गेला होता.
येथील रखमाजीची वस्ती येथे असणाऱ्या काळूबाई देवीच्या मंदिरात या यात्रेनिमित्त सकाळी देवीचा अभिषेक, महापूजा करण्यात आली. दिवसभर सर्व महिलांनी एकत्र येत मंदिर परिसरातच पुरणपोळीचा सामुदायिक नैवेद्य तयार केला. त्यानंतर ४ वाजता देवीच्या उत्सवमूर्तींची ढोलताशांच्या गजरात ग्राममिरवणूक काढण्यात आली. या वेळी अनेकांनी आपल्या घरच्या देवीच्या मूर्तींच्याही मिरवणुकीत सहभाग केला.
या मिरवणुकीदरम्यान मार्गावर रांगोळीच्या पायघड्या टाकत, जलपूजन करीत घरोघरी स्वागत करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता मंदिर परिसरात देवीच्या मानपानाचा कार्यक्रम पार पडला. भाविकांना, सुवासिनींना पुरणपोळीचा प्रसाद देण्यात आला. येथे शेतात देवीचे पुरातन क्षेत्र आहे. याला कुंभारी मंदिर असायचे.
पण कालांतराने कुंभारी मंदिर तयार होणे बंद झाल्याने तीन वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याने येथे भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर)
४रखमाजीची वस्ती येथे असणाऱ्या काळूबाई देवीच्या मंदिरात या यात्रेनिमित्त सकाळी देवीचा अभिषेक, महापूजा करण्यात आली. दिवसभर सर्व महिलांनी एकत्र येत मंदिर परिसरातच पुरणपोळीचा सामुदायिक नैवेद्य तयार केला.
४शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अनेक भाविकांनी आपल्या नवसाची पूर्तताही केली. या वेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने दुमदुमून गेला होता.