शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे? हे केंद्र सरकारला शोभतं का? अजित पवारांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 12:46 IST

आंदोलक काय पाकिस्तान, चीन, बांगलादेशमधून आलेत का?

पुणे : शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही खिळे ठोकता? ही पद्धत आहे का ? आंदोलक काय पाकिस्तान, चीन, बांगलादेशमधून आलेत का? असा संतप्त सवाल विचारत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार सोबतच्या चर्चेच्या तब्बल ११ फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. मात्र प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र त्यानंतर देखील शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याबाबत ठाम असून आता भारतीय किसान युनियनने 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय, राज्य महामार्गावर  चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व दिल्ली पोलीस यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. विविध रस्त्यावर पोलीस , सुरक्षा दल यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यासोबतच खिळे देखील ठोकले आहे. याच मुद्द्याचा संदर्भ घेत अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे.

पवार पुढे म्हणाले, शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनाला बसले असताना, त्यावेळी मत मांडायला कोणी रोखलं होतं ? परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनावर बोलणे हा त्यांचा अधिकार असून त्यात गैर काहीच नाही. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना जगात काही ठिकाणी घडत असतील, तर त्यावर बोलले जातेच ना असाही प्रश्न त्यांनी विचारला. 

भाजपच्या वीजबिल आंदोलनावर अजित पवारांची टीकाविरोधकांकडून विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम सुरु आहे. आपण पन्नास टक्के वीज बिल माफ केले. त्यावरील व्याज आणि दंड व्याज देखील माफ केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून वीजबिल आंदोलन करण्यात येत असल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली आहे. 

फडणवीसांनी आधी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करायला सांगावे मग आम्ही विचार करू

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करून दरवाढ कमी करावी असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यावर अजित पवारांनी देवेंद्र फडणीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना फडणवीसांनी आधी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करायला सांगावे मग आम्ही विचार करू असे भाष्य केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप