नाईक यांचे स्मारक कोल्हापूर-पुण्यात व्हाव
By Admin | Updated: August 24, 2014 22:35 IST2014-08-24T22:26:34+5:302014-08-24T22:35:54+5:30
डी. वाय. पाटील : जे. पी. नाईक यांच्या स्मारक कामाचा प्रारंभे

नाईक यांचे स्मारक कोल्हापूर-पुण्यात व्हाव
उत्तूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक कोल्हापूर-पुणे येथेही होण्याची गरज असल्याचे मत बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजन समारंभप्रसंगी व्यक्त केले.
डॉ. पाटील यांच्याहस्ते पायाखुदाई व कोनशीला समारंभ करण्यात आला. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. अध्यक्ष उमेश आपटे, डॉ. संजय पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, वसंतराव धुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच अर्जुन कुंभार यांच्याहस्ते राज्यपाल डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यपाल पाटील म्हणाले, स्व. व्ही. टी. पाटील व डॉ. जे. पी. नाईक यांचे कार्य मोलाचे आहे. म. गांधी, मदर तेरेसा यांचेसारखे कार्य डॉ. नाईक यांचे होते. शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल करण्याचे काम नाईक यांनी केले. नाईक यांची शिक्षणविषयक प्रणाली जगभर राबविली जात आहे. या स्मारकास भरघोस निधी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेतर्फे देऊ.
जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक जन्मगावी व्हावे ही तळमळ बहिरेवाडीकरांची होती. बहिरेवाडीकरांना दिलेला शब्द पुरा करावयाचा आहे. डॉ. नाईक यांनी शिक्षणाची पताका कायम तेवत ठेवली. स्मारकामुळे बहिरेवाडी पर्यटनस्थळाच्या नकाशावर येणार आहे. हिरण्यकेशी नदीतून पाणी आणून शेतीचा व पाण्याचा प्रश्न निकालात काढणार आहे.
कार्यक्रमास आजरा कारखाना अध्यक्ष विष्णूपंत केसरकर, उपाध्यक्ष मारुती घोरपडे, सुधीर देसाई, रामराजे कुपेकर, संग्रामसिंह नलवडे, रवींद्र आपटे, मुकुंदराव देसाई, जी. टी. पोवार, मंजुषा कदम, संभाजी तांबेकर, भैय्या माने, युवराज पाटील, बाळासाहेब आजगेकर, गोविंद गुरव, चंद्रकांत गोरूले, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, तहसिलदार शिल्पा ठोकडे, बंडोपंत चौगुले, सुरेश खोत, दस्तगीर खलिफ, आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत गोरूले यांनी स्वागत केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचलन केले. काशिनाथ तेली यांनी आभार मानले. (वार्ताहर)