शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

Nagraj Manjule : खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर, नागराज मंजुळे यांना समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 21:09 IST

Nagraj Manjule :

पुणे :  खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने समन्स बजावले आहे. “ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव” पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांनी हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात मंजुळेंसह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि निर्माती ज्योती देशपांडे यांना देखील समन्स बजावले आहे.लेखकाला डावलून खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याचा दुधाणे यांचा आरोप आहे. चित्रपट निर्मिती व प्रदर्शनावर मनाई करण्याची मागणी दुधाणे यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली आहे.वादाची सुरुवात2019 मध्ये नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी चित्रपट निर्मितीसाठी करार केला. लेखक दुधाणे यांना याबाबत अनभिज्ञ ठेवून घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. 2013 सालीच रणजीत जाधव यांनी पत्रकार परिषदेत या पुस्तकावर चित्रपट तयार केला जाईल असे जाहीर केले होते. मात्र, पुढे लेखकाला डावलून झालेल्या करारामुळे दुधाणे यांनी कॉपीराईट कायद्याच्या उल्लंघनाचा दावा केला आहे.बैठका निष्फळ2019 पासून नागराज मंजुळे व लेखक यांच्यात चार वेळा बैठक झाली. 2022 मध्ये लेखकाने नोटीसही पाठवली. त्यानंतर 2023 आणि 2024 मध्ये झालेल्या बैठकींमध्ये लेखकाशी चर्चा करून मानधन व हक्कांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र, यातून मार्ग न निघाल्याने दुधाणे यांनी न्यायालयात दावा दाखल केला.दुधाणे यांनी 2001 साली प्रकाशित केलेले “ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव” हे पुस्तक खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पहिले आणि एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकाच्या 15 आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, याला राज्य पुरस्कारही मिळाला आहे. तेजपाल वाघ यांनी या पुस्तकावर आधारित पटकथा तयार केली होती. मात्र, लेखकाला डावलून चित्रपट निर्मिती सुरू केल्याच्या आरोपांनंतर हा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळेCourtन्यायालयCelebrityसेलिब्रिटीMarathi Actorमराठी अभिनेताMarathi Movieमराठी चित्रपट