शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

...मात्र प्रेम गुपचुप करावे लागते : नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 14:09 IST

आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या.

पुणे : गाैतम बुद्धांसारख्या कितीतरी हुशार माणसांनी माणसाच्या आंतरिक उर्मीला जपले पाहिजे, हे सांगून ठेवले आहे. स्वातंत्र्य, प्रेम या मुल्यांची ओळखही याच हुशार माणसांनी करुन दिली आहे. आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या. 

मुर्टी- माेढवे येथील यशवंतराव माेरे पाटील आश्रमशाळा येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंजुळे बाेलत हाेते. अक्षर मानव चे संस्थापक ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी या कार्यक्रमामागील भूमिका समजावून सांगितली. मंजुळे म्हणाले, प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. स्वातंत्र्यानंतर काेणते मूल्य महत्त्वाचे असेल, तर ते प्रेम हेच आहे. आजकाल मला गर्दीची दहशत वाटते. गर्दीत जायला नकाे वाटतं. गर्दीतून एखादा चेहरा येताे, ताे माझ्याबराेबर सेल्फी काढताे आणि सेल्फी  काढल्या काढल्या निघूनही जाताे. एखाद्याचं पाकीट मारलं गेल्यावर त्याला जसं वाटेल तसंच काहीसं मला या सेल्फी घेणाऱ्यांबाबत वाटतं. एका शब्दाचाही संवाद करायला ते उत्सुक नसतात. त्यामुळे मी जाहीर भाषणे बंद केली आहेत. पण इथं मला मजा येतेय. खूप दिवसांनी मी अशा पद्धतीचा संवाद साधायला आलाे आहे.

तुम्ही हाॅरर फिल्म भविष्यात बनवणार का या प्रश्नावर नागराज म्हणाले, तुमच्या शेजारी बसलेला माणूस तुमच्या जातीचा नाही, ही भावना मनात येणे, हेच मला खूप हाॅरर वाटते. खरेतर आपल्या इथे एकट्या माणसांनी खूप माेठी कामे करुन दाखवली आहेत. शिवबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, र. धाे. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम करुन ठेवलं ते एकत्र समूहाला करता आले नाही. त्यांनी जे सांगितलं ते अंमलात आणला आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच शिवाजीमहाराज यांच्यासारखा माणूस हा जवळ काहीही नसताना स्वराज्याच्या प्रेरणेने उभा राहताे. त्यांची आई जिजाऊ त्याला प्रेरित करते. आणि मावळ्यांच्या मदतीने वेगवेगळी युद्ध काैशल्यं शाेधून काढत हा माणूस स्वराज्याची निर्मिती करताे. शिवाजीमहाराजांचा हा प्रवास मला खूप भारी वाटताे. त्यामुळेच शिवाजीमहाराजांवर चित्रपट करण्याची मला इच्छा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.   

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेPuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज