नादब्रह्म पथक ट्रस्टतर्फे श्रीराम मंदिराला ५४ हजारांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:10 IST2021-02-10T04:10:55+5:302021-02-10T04:10:55+5:30

या वेळी रा. स्व. संघाचे कसबा भाग संघचालक अ‍ॅड. प्रशांत यादव, मोतिबागनगर संघचालक शरद चंद्रचूड, किरण देशपांडे, अभिजित केळकर, ...

Nadabrahma Pathak Trust donates Rs 54,000 to Shriram Temple | नादब्रह्म पथक ट्रस्टतर्फे श्रीराम मंदिराला ५४ हजारांचा निधी

नादब्रह्म पथक ट्रस्टतर्फे श्रीराम मंदिराला ५४ हजारांचा निधी

या वेळी रा. स्व. संघाचे कसबा भाग संघचालक अ‍ॅड. प्रशांत यादव, मोतिबागनगर संघचालक शरद चंद्रचूड, किरण देशपांडे, अभिजित केळकर, अरविंद रावेतकर, परेश देवळणकर, भाजपा युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस सुनील मिश्रा, युवा मोर्चा ओबीसी आघाडी पुणे शहराध्यक्ष तुषार रायकर आदी उपस्थित होते. पथकाचे विश्वस्त कमलेश कामठे, सचिव आनंद खंडेलवाल, कुशल मोडक, माऊली कामठे यांनी निधीचा धनादेश सुपूर्द केला.

पथकाचे सचिव आनंद खंडेलवाल म्हणाले की, नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट केवळ वादनापुरते मर्यादित नाही. वर्षभरात पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छतेच्या अनुषंघाने विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहित केले जाते. अयोध्येतील राममंदिर उभारणीकरिता पथकातील वादकांनी एकत्रितपणे हा निधी देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Nadabrahma Pathak Trust donates Rs 54,000 to Shriram Temple