शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

पोल्ट्री व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ, शवविच्छेदनात कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:04 IST

दोन दिवसांपूर्वी घरातून मित्राबरोबर बाहेर पडलेले पोल्ट्री व्यावसायिक डॉक्टराचा मृतदेह मोटारीत सापडला असून, त्यांच्या शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले आहे़

पुणे - दोन दिवसांपूर्वी घरातून मित्राबरोबर बाहेर पडलेले पोल्ट्री व्यावसायिक डॉक्टराचा मृतदेह मोटारीत सापडला असून, त्यांच्या शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले आहे़ डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, तो रासायनिक पृथ:करणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे़डॉ़ किशोर देविदास शेंडगे (वय ४७, रा़ गणेश नभांगण सोसायटी, रायकरनगर, धायरी) असे त्यांचे नाव आहे़ ते ८ मार्चला दुपारी आपल्या मोटारीतून मित्राबरोबर निघून गेले होते़ शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृतदेह खडकवासला धरणाच्या चौपाटीवर त्यांच्याच गाडीत आढळून आला़ पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला़ त्यात मृतदेह डिकंपोज झाल्याने नेमके कारण सांगता येत नसल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात म्हटले आहे़याबाबतची माहिती अशी, डॉ़ किशोर शेंडगे हे व्हेटनरी डॉक्टर असून त्यांचा कोंबडीची छोटी पिल्ले विकण्याचा व्यवसाय आहे़ साई सुरभी या कंपनीमार्फत ते हैदराबादहून कोंबड्यांची पिल्ले आणून ती येथील शेतकºयांना विकत असत़ ते मूळचे यवतमाळचे असून, गेल्या ९ वर्षांपासून धायरीत राहत आहे़ त्यांचा पत्नी व दोन मुले असा परिवार आहे़ त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते़ त्यावरून त्यांचे पत्नीशी वादही होत असत़ ८ मार्चला दुपारी बारा वाजता ते घरातून बाहेर पडले़ त्यानंतर दीड वाजता परत सोसायटीत येऊन मित्रासह मोटार घेऊन ते निघून गेले़ घरी न परतल्याने त्यांची पत्नी श्रद्धा शेंडगे यांनी रात्री ११ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन करुन संपर्क साधला़ तेव्हा त्यांनी आपण मित्र सागर ठाकर यांच्याबरोबर पानशेत येथील धनगर वस्तीत असल्याचे सांगितले़ त्यानंतरही ते घरी आले नाहीत व त्यांचा मोबाईलही बंद लागत होता़ शेवटी दुसºया दिवशी ९ मार्चला त्यांच्या पत्नीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली़ त्यानंतर शनिवारी रात्री हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वायकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि इतर कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना खडकवासला धरणाजवळच्या चौपाटीपासून थोड्या अंतरावर पुढे एक पांढºया रंगाची मोटार उभी असलेली आढळून आली. याची शहानिशा करण्यासाठी पोलीस मोटारीजवळ गेले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मोटार लॉक केलेली नव्हती़ मागच्या सीटवर एक व्यक्ती होती़ पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले़ मोटारीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी डॉ़ किशोर शेंडगे यांची माहिती मिळाली़एक दिवसात मृतदेह डिकंपोज कसा झाला ?हवेली पोलीस त्यांच्या मित्रांचा शोध घेत असून, शवविच्छेदनात मृतदेह डिकंपोज झाल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगता येत नाही, असे ससूनच्या डॉक्टरांनी म्हटले असून, व्हिसेरा रासायनिक पृथ:करणासाठी पाठविण्यात आला आहे़ डॉ़ शेंडगे हे ८ मार्चला रात्री अकरा वाजेपर्यंत व्यवस्थित होते़ त्यानंतर एकाच दिवसात त्यांचा मृतदेह इतका लवकर डिकंपोज कसा झाला? त्यांना दारूचे व्यसन होते, मग, त्यांचा मृत्यू नेमका कसा व कधी झाला? याची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत़ हवेली पोलीस अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा