चिंचवडमध्ये गळा दाबून बायकोचा खून
By Admin | Updated: June 16, 2015 00:08 IST2015-06-16T00:08:58+5:302015-06-16T00:08:58+5:30
घरगुती वादातून नवऱ्यानेच बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना चिंचवड येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

चिंचवडमध्ये गळा दाबून बायकोचा खून
पिंपरी : घरगुती वादातून नवऱ्यानेच बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना चिंचवड येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी दीपक उल्लारे (वय २८ , रा. बाबू चिंचवडे चाळ, चिंचवडगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती दीपक अशोक उल्लारे (वय ३२) याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक याचे दोन विवाह झाले असून, अश्विनी ही त्याची दुसरी बायको आहे. दीपकला पहिल्या बायकोकडे राहायला जायचे होते. या कारणावरून दीपक व अश्विनीमध्ये वारंवार वाद होत होते. कधी हे वाद विकोपाला जात होते. रविवारी रात्रीदेखील या कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात दीपकने अश्विनीचा गळा आवळून खून
केला. त्यानंतर त्याला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)