शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

माझा कचरा माझी जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:14 IST

केंद्र सरकारने मात्र SWM रूल्स २०१६प्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाबद्दल सुस्पष्ट नियम घालून दिलेले आहेत; त्याप्रमाणे प्रत्येक नगरपरिषद ,नगरपालिका ,महानगरपालिका अथवा ...

केंद्र सरकारने मात्र SWM रूल्स २०१६प्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाबद्दल सुस्पष्ट नियम घालून दिलेले आहेत; त्याप्रमाणे प्रत्येक नगरपरिषद ,नगरपालिका ,महानगरपालिका अथवा ग्रामपंचायती यांना स्वतःच्या परिसरातील निर्माण होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण तयार करणे ,त्यासाठी व्यवस्था लावणे गावच्या तसेच शहरातील रहिवाशांना योग्य संदेश व मार्गदर्शन करणे व कचऱ्याचा पुनर्वापर करण्यास शिकवणे. घनकचरा, कंपोस्टिंग, बायोगॅस, बायोचार इत्यादी तंत्रज्ञानाचे प्रकल्प लावण्यासाठी जबाबदार ठरवले आहे . या सर्व पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सर्व आस्थापनांना घनकचऱ्यासाठी त्यांच्या आवारामध्ये कंपोस्टिंग अथवा बायोगॅस तसेच प्लास्टिक पुनर्वापरासाठीं योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत व ही व्यवस्था ज्या ज्या गृहसंकुलांमध्ये निर्माण केली जाते आहे, त्यांना मालमत्ताकरात ५ % सूट देखील देण्यात येत आहे.

गृहनिर्माण संस्था, इमारती यामध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यासाठी गृहसंकुलांच्या आवरामध्येच आटोपशीर अशा टाक्या बांधून त्यामध्ये कंपोस्टिंगचे प्रकल्प चालू केल्यास या समस्येला आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. सध्या अनेक गृहसंकुलांमध्ये अशा प्रकारचे खतनिर्मिती प्रकल्प गेली अनेक वर्षे चालू आहेत. या कंपोस्ट तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे या प्रकारचे कंपोस्ट प्रकल्प गृहसंकुलांचा एक अविभाज्य भाग असले पाहिजेत. तेथे दररोजच्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग होत असताना कुठल्याही प्रकारे दुर्गंधी येणार नाही व माशा तसेच मच्छर होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. कंपोस्ट प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा देखील प्रकल्प डिझाइन करताना पुरेपूर विचार केला पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर या प्रकल्पामुळे कुठलाही दुष्परिणाम होणार नाही.

सध्या इनोराच्या कंपोस्ट तंत्रज्ञानाप्रमाणे ४८० गृहसंकुलांमधून २५ टन कचरा हा तिथल्या तिथेच जिरवला जातो; तसेच बऱ्याच गृहसंकुलांमधून ४० टन पालापाचोळ्याचे कंपोस्टिंग होते व त्याचा भार हा महानगरपालिका यंत्रणेवर पडत नाही. उदाहरण म्हणून समजा साधारणतः १० सदनिकांची सोसायटी असेल तर तिथे अंदाजे १० किलो ओला कचरा निघत असेल, त्या कचऱ्यासाठी तुम्हाला १५'X ३'X ३' फुटांची टाकी बांधावी लागेल. साधारण ४५ चौरस फूट जागा तुम्हाला कंपोस्टिंग साठी लागेल. त्या टाकीत तुम्ही रोजचा १० किलो ओला कचरा टाकावा. दर आठ दिवसांनी त्यावर संबंधित औषधें वापरून आपण तो कचरा वरखाली करावा, त्यामुळे कचऱ्यातील अनावश्यक वायू निघून जातील; त्यावर विशिष्ट द्रव्यांचा वापर केल्यास ओल्या कचऱ्याचा वास येणार नाही. आता ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग म्हटले की या पावसाळ्याच्या मोसमात कचऱ्यात ओलावा जास्त झाला तर तुम्ही त्यात पेपरचे बोळे करून टाका, नाहीतर सुका पालापाचोळा टाकावा. त्यामुळे कचऱ्यातील आर्द्रता कमी होईल. आता १० सदनिकांच्या सोसायटीमध्ये १० किलो कचरा निघत असेल तर महिन्याचा ३०० किलो कचरा झाला तीन महिन्यांचा ९०० किलो ओला कचरा झाला. त्यापासून तुम्हाला १०० किलो खत मिळेल. हे खत अनेक संस्था योग्य दराने विकत देखील घेतात. यामुळे आपल्याला काही प्रमाणात आर्थिक फायदादेखील होईल; किंवा हेच खत आपण आपल्या सोसायटीमधील झाडांसाठी वापरल्यास सोसायटीमधील झाडांनादेखील हे खत घालता येते. कोरडा कचरादेखील घराघरांतून वेगळा केला गेल्यामुळे त्याची प्रतही वाढते. त्या कोरड्या कचऱ्याला योग्य दरदेखील मिळतो. तयार झालेले कंपोस्ट गृहप्रकल्पाच्या बागांमध्ये, तेथील रहिवाशांच्या घरांतील कुड्यांमध्ये तसेच टेरेस गार्डनमध्ये वापरतात. हा विचार प्रत्येक आस्थापनाने नवीन होणाऱ्या गृहप्रकल्पासाठी जर सुरवातीपासूनच केला तर कचऱ्याचा महानगरपालिका व्यवस्थेवरील ताण कमी होईल व तेथील कचरा डेपोमुळे आजूबाजूच्या परिसरामधील जनतेला जो त्रास सहन करावा लागतो तो कमी करण्यासाठी खूप मोठा हातभार लागत आहे. तरी आता गृहसंकुलांनी स्वतःच्या कचऱ्याची जबाबदारी स्वतःच्या आवारातच कंपोस्टिंग करून व कोरड्या कचऱ्याचे विलगीकरण करावे. हे केल्यामुळे प्रत्येक घरकुलास स्वताचा पर्यावरण सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचल्याचे समाधान मिळेल. सध्या पुणे शहरातील प्रती कुटुंब, दररोजचा कचरा सुमारे ५०० ते ७५० ग्रॅम आहे. या अंदाजानुसार आणि आपल्या गृहसंकुलातील एकूण सदनिकांच्या संख्येनुसार आपण खत प्रकल्पाचे नियोजन करू शकतो. अंदाजे ५०० किलो कचरा जर आपल्या सोसायटीमध्ये तयार होत असेल तर अंदाजे २२५० चौ. फुटांची टाकी असणे आवश्यक आहे अंदाजे या टाकीचा आकार २५'X ३'X ३' प्रमाणे असू शकतो. साधारणपणे ७ वारांप्रमाणे ७ टाक्या आपण आपल्या सोसायटीमध्ये बांधू शकता.

मंजूश्री तडवलकर

इनोरा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड