माझी उमेदवारी पुरंदर-हवेलीसाठी

By Admin | Updated: September 27, 2014 23:30 IST2014-09-27T23:30:10+5:302014-09-27T23:30:10+5:30

केवळ छत्नपतींच्या नावाने राजकारण करता त्यांच्या विचारातील एक, दोन गोष्टी तरी आचरणात आणा, अशी टीका पुरंदर-हवेलीचे आमदारांचे नाव न घेता कॉँग्रेसचे युवा नेते संजय जगताप यांनी त्यांच्यावर केली.

My candidature for Purandar-Haveli | माझी उमेदवारी पुरंदर-हवेलीसाठी

माझी उमेदवारी पुरंदर-हवेलीसाठी

>सासवड : केवळ छत्नपतींच्या नावाने राजकारण करता त्यांच्या विचारातील एक, दोन गोष्टी तरी आचरणात आणा, अशी टीका पुरंदर-हवेलीचे आमदारांचे नाव न घेता कॉँग्रेसचे युवा नेते संजय जगताप यांनी त्यांच्यावर केली. 
माङया आयुष्यातील आजचा सर्वात मोठा क्षण असून, ही उमेदवारी ‘संजय’ला नसून पुरंदर-हवेलीला मिळाली आहे आणि गेल्या पाच वर्षाच्या प्रय}ांचे हे फलित आहे. सासवड येथे शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित गांधी मैदानातील प्रचारसभेत जगताप यांनी हे आवाहन केले.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष देविदास भन्साळी, माजी आमदार चंदुकाका जगताप, इंदापूरचे जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक मुरलीधर निंबाळकर यांच्यासह पुरंदर-हवेलीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. शशिकांत काकडे, प्रथमेश कडलग, विकास इंदलकर, माऊली यादव, देवा नाझीरकर, संजय हरपळे, मुरलीधर निंबाळकर, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांची भाषणो झाली. 
सासवडचे ज्येष्ठ नागरिक बिरदीभाऊ नवलाखा, जि. प. सदस्या मनीषा काकडे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप धुमाळ, प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, गणोश मेमाणो,  भारती गायकवाड, शैला जगताप, स्वाती होले, हवेलीतील संजय जाधव, विशालनाना हरपळे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी पुरंदर आणि हवेलीतील विविध पक्षांच्या प्रमुख कार्यकत्र्यानी संजय जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
प्रा. सचिन दुर्गाडे यांनी सूत्नसंचालन केले. गणोश मेमाणो यांनी आभार मानले. 
सासवड येथील गांधी मैदान चौकात कॉँग्रेसचे युवा नेते संजय जगताप यांनी घेतलेल्या सभेला मोठा प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)
 
पदयात्र काढून जगताप यांनी दाखल केला अर्ज
सासवड : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याने पुरंदर-हवेली मतदारसंघातून आज काँग्रेसकडून संजय चंदुकाका जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार चंदुकाका जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, हवेलीतील संजय हरपळे यांच्या उपस्थितीत जगताप यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्नय कवितके यांच्याकडे अर्ज दाखल केला. याप्रसंगी सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, जिल्हा परिषद सदस्या मनीषा काकडे, पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे,  नगरसेवक, पुरंदर-हवेलीतील कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी संजय जगताप यांनी सासवड नगरपालिकेतील छत्नपती शिवराय, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शहरातील मुख्य रस्त्याने पदयात्र काढण्यात आली. कार्यकत्र्याच्या गर्दीमुळे सासवड शहर, तसेच जेजुरी-पुणो हा मुख्य रस्ता फुलून गेला होता.
 
एकदाच संधी द्या, 
सोनं करेन!
पुरंदरची यापुढची निवडणूक भावनांवर खेळली जाणार नसून, विकासाच्या मुद्यावरच खेळली जाईल. याचे भान विरोधकांनी ठेवावे, मला पुरंदरचे नेतृत्व करायचं नसून, प्रतिनिधित्व करायचे आहे. विकसित पुरंदर-हवेलीचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं आहे. यासाठी केवळ एकदाच संधी द्यावी, असे आवाहनही जगताप यांनी केले. 
 
उद्याच्या मुख्यमंत्र्यांचा लाडका आमदार म्हणून पुरंदर तालुक्यातून कॉँग्रेसचे युवा नेते संजय जगताप यांना विधानसभेत पाठवा.
- मुरलीधर निंबाळकर, 
संचालक, इंदापूर मार्केट कमिटी
सन 2क्क्4 मध्ये अशोक टेकवडे यांना निवडून आणण्यात आम्ही जे योगदान दिले, त्याची परतफेड या निवडणुकीत करा.
- देविदास भन्साळी, 
जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस

Web Title: My candidature for Purandar-Haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.