शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणाची केरळवासियांसाठी मदतीची साद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 20:13 IST

आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने  रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या केरळवासियांच्या मदतीच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले.

ठळक मुद्देकुर्बानी केरळसाठी - पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनपैगंबर शेख हा छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर रविवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह व्हिडिओद्वारे आवाहन

वारजे : कधी कधी सामाजिक बांधिलकी जपताना धर्माच्या भिंती नकळत अस्पष्ट होतात. केरळमधील नैसर्गिक आपत्तीच्या निमित्ताने ही सामाजिक सलोख्याची सद्भावना जपत एका मुस्लिम बांधवाने बुधवारी देशभरात साजरा होणाऱ्या बकरी ईद च्या निमित्ताने आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. ईदच्या निमित्ताने खरेदी होणाऱ्या बकऱ्याच्या खर्चाला कात्री लावत हा निधी केरळमधील पुरग्रस्त बांधवांना हस्तांतरीत करण्याचे आवाहन पुण्यातील वारजे येथील पैगंबर शेख  हा  मुस्लीम तरुण करत आहे.

 आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले.केरळवासियांना मदत करण्यासाठी रविवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह व्हिडिओद्वारे आवाहन केले. कुर्बानीसाठी काही नागरीक अफाट खर्च करत असतात. यासाठी मोठा व विशेष बोकड खरेदी करण्याच्या पावित्रा अनेक जणांचा असतो.अल्लाह हा फक्त आपली नियत व भावना पाहत असतो. केरळ मधील आपले बंधु भगिनी नागरीक हे अस्मानी संकटात असताना आपण फक्त टिव्ही व वर्तमान पत्रात बातम्या वाचून सुस्कारा सोडण्यात अर्थ नाही. यासाठी फक्त मुस्लिमच नाही तर सर्व धर्मीय बंधु भगिनींना आवाहन करण्यात आले आहे. निधी हस्तांतरीत केल्यावर त्याचा स्क्रीन (स्नप) शॉट आपल्या फेसबुक पेजवर प्रसारीत करण्याचे आवाहन देखील केले आहे. ज्याने इतर जणांना अशी मदत करण्याची चालना मिळेल. पैगंबर शेख हा छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याने गेल्याच आठवड्यात संविधान सन्मान सभेत सहभागी होण्याचे आवाहनाला देखील खूप प्रतिसाद मिळाला होता. तो स्वत: देखील या सभेत सामील झाला होता. याशिवाय गड संवर्धन व गड भटकंती मोहिमेत देखील तो सहकार्यांंसह अग्रेसर आहे. .................................बकरी ईदच्या तुमच्या कुर्बानीतील काहीच अंश अल्लाहपर्यंत पोहचत नाही जी पोहचते ती फक्त तुमची सद्भावना. या ईदला जर आपण केरळवासियांच्या दु:खावर अशा प्रकारची मदत करून काहीअंशी फुंकर मारायचा प्रयत्न केला पाहिजे. हीच इस्लामची शिकवण आहे. माझे मित्र समीर नदाफ याने बोकडाच्या खरेदीतील हिस्सा व मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चात कपात करून तीन हजार रुपये केरळ मुख्यमंत्री निधीमध्ये ट्रान्स्फर केले आहेत. निधी हस्तांतरित करण्यासाठी आॅनलाइन ट्रान्सफर सुविधा उपलब्ध असून यासाठी सरकारने स्टेट बँकेचे खाते उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय पेटीम या आॅनलाइन पेमेंट प्रणालीमध्ये देखील केरला / कोडगू फ्लड या नावाने पेमेंटची लिंक उपलब्ध आहे.  पैगंबर शेख#कुर्बानीकेरळसाठी 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीKeralaकेरळSocial Mediaसोशल मीडियाBakri Eidबकरी ईद