शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

संगीताचा दर्जा खालावला; गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:08 IST

‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे'एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे''आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात'

पुणे : ‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याप्रमाणे आपणही पुढे गेले पाहिजे. मात्र, आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात. त्यामुळे, पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले, ‘रसिकांची अभिरुची लक्षात घेऊन चित्रपट तयार केले जातात, गाणी लिहिली जातात. मात्र, एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. संगीताची उंची कायम राखायची असेल तर अभिरुची आणि दर्जा यांचा समतोल साधायला हवा. त्यातूनच समाजाला चांगल्या संगीताची ओळख होईल आणि त्यांची अभिरुची बदलायला मदत होईल.’‘संगीत क्षेत्रात तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. मात्र, तंत्रज्ञान संगीतापेक्षा मोठे होणार नाही, याची काळजी गायक आणि संगीत संयोजकांनी घेतली पाहिजे. पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास संगीताचा बाज बिघडण्याची शक्यता असते. रसिकांमध्ये संगीत साक्षरता आणण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. त्यापेक्षा संगीतातून ही प्रक्रिया सुलभपणे घडू शकते.

टॅग्स :Puneपुणे