शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संगीत नाटक दुष्टचक्रात अडकले आहे : कीर्तनकार चारूदत्त आफळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 13:29 IST

संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनाचे काम केले नाही तर भाषेसाठी आणि समाजप्रबोधनासाठी हे मोठे योगदान दिले आहे. 

ठळक मुद्देपुणे महानगरपालिकेतर्फे चारुदत्त आफळे यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीरसंगीत नाटकांना मोठी परंपरा आहे. ती परंपरा तरुण कलाकारांपर्यंत पोहोचवण्याची गरज

पुणे : संगीत नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तरी या कलाप्रकाराने महाराष्ट्राचे मन घडवले आहे. सध्या संगीत नाटक एका दुष्टचक्रामध्ये अडकले असून, संगीत नाटकाचे प्रयोग होत नाही म्हणून कलाकार मिळत नाही आणि कलाकार मिळत नाही म्हणून प्रयोग होत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ कीर्तनकार आणि रंगकर्मी चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली.पुणे महानगरपालिकेतर्फे चारुदत्त आफळे यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त संवाद पुणे संस्थेतर्फे चारुदत्त आफळे यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, रवींद्र खरे, संतोष चोरडिया, वंदन नगरकर, शुभांगी आफळे आदी उपस्थित होते.चारुदत्त आफळे म्हणाले, संगीत नाटकांना मोठी परंपरा आहे. ती परंपरा तरुण कलाकारांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. संगीत नाटक हेच ख-या अर्थाने भविष्यात पुढे घेऊन जाणार आहे. संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनाचे काम केले नाही तर भाषेसाठी आणि समाजप्रबोधनासाठी हे मोठे योगदान दिले आहे. कीर्ती शिलेदार म्हणाल्या, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकामध्ये मराठी भाषेची अवस्था पाहिली की वाईट वाटते. परंतु याच वेळी मराठी संगीत नाटकांनी अभिजात मराठी भाषा जपली आहे. त्या माध्यमातून मराठी भाषा तरुणांपर्यंत पोहोचविली पाहिजे. तरुणांपर्यंत संगीत नाटक पोहोचले तर पुन्हा एकदा संगीत नाटकांचा सुवर्णकाळ परत येईल .प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, जेव्हा शिक्षण हे केवळ काही वगार्पुरतेच मर्यादित होते. या काळामध्ये ख-या अर्थाने समाज प्रबोधन करण्याचे काम कीर्तन आणि संगीत नाटकांनी केले. बालगंधर्व यांच्यापासून आलेला वारसा समर्थपणे पुढे नेत चारुदत्त आफळे यांनी मराठी संगीत रंगभूमी अधिक समृद्ध केली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. आम्ही एकपात्री आणि भरत नाट्य मंदिर संशोधन संस्थेतर्फे यावेळी चारुदत्त आफळे यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCharudatta Aafleचारुदत्त आफळे