‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटाची उद्या सांगीतिक पर्वणी
By Admin | Updated: July 2, 2017 03:19 IST2017-07-02T03:19:38+5:302017-07-02T03:19:38+5:30
‘लोकमत’च्या वतीने ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ या चित्रपटाच्या सांगीतिक पर्वणीचे आयोजन दि. ३ रोजी करण्यात आले आहे. या

‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटाची उद्या सांगीतिक पर्वणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘लोकमत’च्या वतीने ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ या चित्रपटाच्या सांगीतिक पर्वणीचे आयोजन दि. ३ रोजी करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अविनाश-विश्वजित, गायक रोहित राऊत, गायिका प्रियांका बर्वे, आनंदी जोशी तसेच चित्रपटाची नायिका दीप्ती देवी आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या चित्रपटातील गीते तसेच अन्य गीतेही सादर केली जाणार आहेत. या चित्रपटात दीप्ती देवी ‘आरजे स्वरा हळदणकर’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे आणि या कार्यक्रमात लोकमतच्या वाचकांबरोबर गप्पा मारणार आहे.
संगीत हा नेहमीच भारतीय चित्रपटांचा आत्मा राहिला आहे. सुमधुर संगीताने असंख्य चित्रपटांना यशाची चव चाखायला मिळाल्याचे आपण नेहमी बघतो. मराठी सिनेसंगीतातला अलीकडचा कालखंड ‘संगीतमय’ झाल्याचे आपल्याही लक्षात आले असेल.
या चित्रपटांना ‘सुरेल’ करणाऱ्या गुणी संगीतकारांपैकी एक म्हणजे अविनाश आणि विश्वजित ही जोडी. अनेक चित्रपटांना नावीन्यपूर्ण संगीत देणारी ही जोडी आता संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शनच्या कंडिशन्स अप्लाय-अटी लागू या चित्रपटासाठी संगीताची हटके मेजवानी घेऊन आली आहे. डॉ. संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिनांक : सोमवार, दि. ३ जुलै
वेळी : दुपारी २ वाजता
स्थळ : मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर येथील कला व वाणिज्य शाखेच्या इमारतीतील सभागृह.