स्थायी समिती अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

By Admin | Updated: March 30, 2017 00:16 IST2017-03-30T00:16:45+5:302017-03-30T00:16:45+5:30

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली

Murlidhar Mohol, Chairman of Standing Committee | स्थायी समिती अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

स्थायी समिती अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी माघार घेतल्यामुळे मोहोळ यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
अपंगकल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पिठासीन अधिकारी म्हणून सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणुकीचे कामकाज सुरू केले. महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले यावेळी उपस्थित होते. भाजप तसेच आघाडीच्या अनेक नगरसेवकांनीही निवडणुकीसाठी सभागृहात हजेरी लावली होती. नगरसचिव सुनिल पारखी यांनी पाटील यांना साह्य केले.

Web Title: Murlidhar Mohol, Chairman of Standing Committee