पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:57+5:302021-04-25T04:09:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून तिघा जणांनी एका तरुणावर कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार करून खुुनाचा प्रयत्न केला. विकी ...

Murderous attack on a young man out of prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्यातून तिघा जणांनी एका तरुणावर कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार करून खुुनाचा प्रयत्न केला.

विकी ऊर्फ विक्रम सुरेश जमादार (वय २१, रा. मार्केट यार्ड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मार्केट यार्ड पोलिसांनी आरबाज असलम शेख (वय २२), सलमान असलम शेख (वय २०), पिल्या उर्फ सतीश गुलाब शिरसाठ (वय २२, सर्व रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) या तिघांना अटक केली आहे. याबाबत नंदा सुरेश जमादार (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर गल्ली क्रमांक तीन येथे गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

आरोपीची व फिर्यादींचा मुलगा विकी उर्फ विक्रम यांची मागील काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरबाज, सलमान व पिल्या सिरसाठ यांनी संगनमत करून कोयता व इतर धारधार हत्याराने विकीवर हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून मार्केट यार्ड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव करीत आहेत.

Web Title: Murderous attack on a young man out of prejudice