अज्ञात व्यक्तीचा काळेवाडीत खून
By Admin | Updated: January 25, 2017 02:06 IST2017-01-25T02:06:58+5:302017-01-25T02:06:58+5:30
काळेवाडी व रहाटणी भैयावाडीतील मोकळ्या जागेत झाडा-झुडपांत एका अज्ञात व्यक्तीचा जखमी अवस्थेतील मृतदेह मंगळवारी

अज्ञात व्यक्तीचा काळेवाडीत खून
पिंपरी : काळेवाडी व रहाटणी भैयावाडीतील मोकळ्या जागेत झाडा-झुडपांत एका अज्ञात व्यक्तीचा जखमी अवस्थेतील मृतदेह मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आढळून आला. वाकड पोलिसांनी पंचनामा करून रुग्णवाहिकेतून मृतदेह वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला. डोक्यात दगडी फरशी मारून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चतु:शृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने, तसेच वाकड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर
जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, महेश सागडे,
महेंद्र कदम, महेंद्र आहेर व अन्य
पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)