शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाचा मर्डर करणाऱ्यास पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 21:58 IST

आनंद नारायण हा मुंबईतील एका वृत्तवाहिनीत मार्केटिंग विभागात काम करीत होते.

पुणे : हॉटेल व्यवसायातील वादातून भागीदाराचा खुन करुन पुण्यात पळून आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पकडले. खुनाची घटना घडल्यानंतर 12 तासात पुणे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. सारंग हरीश पाथरकर (वय 34, रा़ सामना परिवार सोसायटी, गोरेगाव इस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव असून त्यास शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळून अटक करण्यात आली. आनंद नारायण (रा. अँटॉप हिल, मुंबई) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अँटॉप हिल भागात घडली होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आनंद नारायण हा मुंबईतील एका वृत्तवाहिनीत मार्केटिंग विभागात काम करीत होते. ती नोकरी सोडून त्यांनी सारंग पाथरकर यांच्याबरोबर भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरु केला. परेल भागात त्यांचे हॉटेल आहे. त्यानंतर आनंद नारायण यांनी दादर भागात 4 ते 5 महिन्यांपूर्वी दुसरे हॉटेल सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी परेल येथील हॉटेलमधील साहित्य वापरले होते़ हे नवीन हॉटेल चालत नसल्याने त्यांनी सारंग याला ते चालविण्यास घेण्यास सांगितले होते़ यावरुन त्यांच्यात आर्थिक वाद सुरू झाला होता. सोमवारी रात्री आनंद नारायण, सारंग पाथरकर व आणखी एक जण आनंद यांच्या अँटॉप हिल येथील फ्लॅटवर दारु पित बसले होते. मध्यरात्री एक ते दीडच्यासुमारास त्यांच्यात वाद झाला, तेव्हा सारंग याने आनंद यांच्या गळ्यावर वार करुन त्यांचा खुन केला. त्यानंतर तो पळून गेला. त्यांच्याबरोबरच्या माणसाने ही बाब अँटॉप हिल पोलिसांना कळविली. पोलिसांनी सारंगचा शोध सुरु केला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकातील पोलीस नाईक तुषार खडके व हवालदार रिजवान जिनेडी यांना मुंबईत खुन करुन एक जण पुण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळून सारंग पाथरकर याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. पुणे पोलिसांनी अँटॉप हिल पोलिसांकडे चौकशी केल्यावर आनंद नारायण यांच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती दिली. पुणे पोलिसांनी सारंगला पकडल्याचे समजताच मुंबई पोलिसांचे पथक तातडीने पुण्यात आले. सारंगला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, दिनेश पाटील, तुषार खडके, रिजवान जिनेडी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून