डोक्यात दगड घालून तरुणाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST2021-05-12T04:11:53+5:302021-05-12T04:11:53+5:30

अमोल शंकर रांजणे (वय ३०, रा. जांभुळवाडी ता. हवेली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली ...

Murder of a young man by throwing a stone at his head | डोक्यात दगड घालून तरुणाच खून

डोक्यात दगड घालून तरुणाच खून

अमोल शंकर रांजणे (वय ३०, रा. जांभुळवाडी ता. हवेली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल याचे त्याच्या पत्नी देविका हिच्याशी मोठे बांडण झाले त्यामुळे ते काही दिवसांपासून लांब राहत होते. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी अमोल याचा भाऊ किरण याने देविकाला पुन्हा धानवले गावी आणले, मात्र त्यावरून अमोल याने किरण व देविका यांच्याबरोबर मोठे भांडण केले व शिवीगाळ केली. मात्र अमोल यांची बहिण मनिषा व भाऊजी चंद्रकांत यांनी त्यांचे भांडण मिटवले व त्यांना पुन्हा जांभुळवाडीला पाठवले. त्यानंतर काल (सोमवारी) चंद्रकांत धानवले हे घराची भिंत बांधण्याचे काम करत असताना गावातील एका मुलाने सांगितले की, पऱ्हर येथील सोमजाई मंदीराजवळच्या झुडपात एका माणसाचा मृतदेह पडला आहे. तो चंद्रकांत यांच्या पत्नीने जाऊन पाहिल्यावर तो अमोल रांजणेचाच असल्याच निष्पन्न झाले. अमोल याच्या डोक्यात दगड घालून खुन करुन मृतदेह झुडपात टाकलेला असल्याचे दिसले. त्यामुळे भोर पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मनिषाय यानी फिर्याद दिली आहे.

Web Title: Murder of a young man by throwing a stone at his head