पैशांच्या वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:09 IST2021-04-17T04:09:33+5:302021-04-17T04:09:33+5:30

पुणे : पैशांच्या व्यवहारातील वादामधून तरुणाने कोयत्याने वार केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. एरंडवण्यातील ...

Murder of a young man over a money dispute | पैशांच्या वादातून तरुणाचा खून

पैशांच्या वादातून तरुणाचा खून

पुणे : पैशांच्या व्यवहारातील वादामधून तरुणाने कोयत्याने वार केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. एरंडवण्यातील साठे चौकात २३ मार्चला ही घटना घडली.

इंद्रनील चंद्रभूषण मिश्रा (वय ४०, रा. खिलारवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रवीण शंकर कडू (वय ३७, रा. सिंहगड रोड) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. मंगला मिश्रा (वय ६७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाने आरोपीकडून पैसे घेतले होते. मात्र, पैसे परत करण्यास उशीर झाल्यामुळे आरोपीने २३ मार्चला इंद्रनीलला शिवीगाळ करून कोयत्याने वार केले होते. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या इंद्रनीलला रुग्णालयात दाखल केले होेते. उपचारादरम्यान १४ एप्रिलला त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी संबंधिताविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. इंद्रनीलचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांनी दिली आहे.

Web Title: Murder of a young man over a money dispute