शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; सिंहगड रोडवरील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 21:05 IST

रागाच्या भरात पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीला चाकूने भोसकून खून केल्याची घटना सिंहगड रोडवरील धायरी येथे घडली. ही घटना धायरीतील महादेवनगर येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली़.वृषाली संतोष सुरगुडे  (वय २९, रा. महादेवनगर, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष रामचंद्र सुरगुडे (वय ३२) याला सिंहगड रोडपोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , संतोष सुरगुडे हा एका पावडर कोटिंग कंपनीत काम करतो. तर, त्याची पत्नी एका खासगी कंपनीत काम करत होती. त्यांचा ८ वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना एक मुलगी आहे. संतोष यांचा भाऊ व इतर कुटुंबीय वरच्या मजल्यावर राहतात.लॉकडाऊनमुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून घरातच होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होते. पत्नीचे पोट दुखत असल्याने संतोषने तिला सकाळी दवाखान्यात नेले होते. त्यानंतर दुपारी ते दोघे झोपले होते. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात संतोष याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. पत्नीचा आरडाओरडा ऐकून वरच्या मजल्यावरील त्यांचे भाऊ व इतर खाली आले.तेव्हा पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी संतोष सुरगुडे याला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक