नशा करू देत नसल्याने डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST2021-05-09T04:12:11+5:302021-05-09T04:12:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्कर परिसरात कचरा गोळा करणार्‍या वृद्धाचा खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या ...

Murder by throwing stones at the head for not allowing intoxication | नशा करू देत नसल्याने डोक्यात दगड घालून खून

नशा करू देत नसल्याने डोक्यात दगड घालून खून

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्कर परिसरात कचरा गोळा करणार्‍या वृद्धाचा खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मोहंमद आझाद सुक्कसबा शाह (वय २१, रा. मोदीखाना, लष्कर, मूळ रा. बिजनौर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.

भंगार गोळा करणारे इस्माईल शेख यांचा ६ मे रोजी डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक मोरे व भोसले यांची दोन पथके आरोपींचा शोध घेत होते. इस्माईल हे पाल टाकून रहात होते. त्यांचे वर्तनही चांगले होते. पोलीस नाईक मोहसिन शेख यांना माहिती मिळाली की, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्यापासून जवळच राहणारा मोहंमद शाह हा शेख यांच्या घराजवळ येऊन मद्यपान करत असे. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते. या माहितीवरून पोलिसांनी शाह याला ताब्यात घेऊन चौकशी केली. कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. शाह हा शेख याच्या पालाशेजारी येऊन मद्यपान करत असे. त्यामुळे ईस्माईल शेख आणि शाह यांच्यात वाद झाले. याबाबत शेख याने शाह यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. भावाच्या पत्नीला याबाबत सांगितल्याने शाह याने ६ मे रोजी पहाटे ३ वाजता शेखच्या डोक्यात दगड घालून खून केला व परत घरात जाऊन झोपला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, प्रकाश मोरे, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार किशोर वग्गू, नामदेव रेणुसे, मोहसिन शेख, उत्तर तारू यांच्या पथकाने केली.

Web Title: Murder by throwing stones at the head for not allowing intoxication