भरदिवसा गुंडाचा कोयत्याने वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:14+5:302021-07-12T04:09:14+5:30

पुणे : दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौकाजवळ रविवारी सायंकाळी एका गुंडाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. अक्षय ...

Murder by stabbing a goon all day long | भरदिवसा गुंडाचा कोयत्याने वार करून खून

भरदिवसा गुंडाचा कोयत्याने वार करून खून

पुणे : दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौकाजवळ रविवारी सायंकाळी एका गुंडाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला.

अक्षय किरतकर्वे (वय ३६) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.

अक्षय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर ६ गुन्हे दाखल होते. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला पोलिसांनी तडीपार केले होते. त्याच्या तडीपारीची मुदत नुकतीच संपली होती.

रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो मांगीरबाबा चौकाजवळ आला असताना चौघांनी भररस्त्यात त्याच्यावर कोयत्याने आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हे चौघे तेथून पसार झाले आहे. यादरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

वर्चस्वाच्या वादातून अक्षय याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत असले तरी अद्याप खुनामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder by stabbing a goon all day long