भंगार गोळा करणाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:12 IST2021-05-07T04:12:09+5:302021-05-07T04:12:09+5:30

पुणे : लष्कर परिसरातील न्यू मोदीखाना येथे एका भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. इस्माईल शेख ...

Murder of a scrap collector | भंगार गोळा करणाऱ्याचा खून

भंगार गोळा करणाऱ्याचा खून

पुणे : लष्कर परिसरातील न्यू मोदीखाना येथे एका भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. इस्माईल शेख (वय ६५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना न्यू मोदीखाना येथील गाई म्हशीच्या गोठ्याजवळ आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लष्कर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. इस्माईल शेख हे रस्त्यावर फिरून भंगार गोळा करण्याचे काम करत असत. येथील एका गिरणीच्या पाठीमागे पाल टाकून ते तेथे राहत होते. रात्री ते तेथेच झोपले होते. दरम्यानच्या काळात कोणीतरी शेख यांच्या डोक्यात कोणत्या तरी वस्तूने वार करून त्यांचा खून केला. त्यांच्या ओळखीची एक व्यक्ती त्यांना उठविण्यासाठी गेली असताना हा प्रकार उघडकीस आला. लष्कर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a scrap collector