देहविक्रय करणाऱ्या महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST2021-05-06T04:10:21+5:302021-05-06T04:10:21+5:30
आरोपीचे पलायन : पोलिसांकडून शोध सुरू लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेत देहविक्रय करणाऱ्या ३० वर्षांच्या महिलेचा तिच्या ...

देहविक्रय करणाऱ्या महिलेचा खून
आरोपीचे पलायन : पोलिसांकडून शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेत देहविक्रय करणाऱ्या ३० वर्षांच्या महिलेचा तिच्या मित्राने चाकूने भोसकून खून केला. ही घटना बुधवार पेठेत पहाटे साडेतीन वाजता घडली.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बकर नावाच्या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा खून केल्यानंतर बकर हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बकर आणि ही ३० वर्षांची महिला दोघेही मूळचे पश्चिम बंगालमधील राहणारे आहेत. बकर हा भोसरीतील एका हॉटेलमध्ये वेटर आहे. त्यांची पूर्वीपासून ओळख आहे. तो अधूनमधून या महिलेकडे येत असत. बकर हा या महिलेच्या पतीला फोन करून तिच्याबद्दल माहिती देत होता. त्यावरून त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. तिने बकरला मारहाण केली होती. त्याचा बकरला राग होता.
बुधवारी मध्यरात्री बकर हा तिच्या बुधवार पेठेतील घरी आला होता. माहिती सांगण्याच्या व फोटोच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात त्यांनी एकमेकांना मारहाण केली. रागाच्या भरात बकर याने घरातील चाकूने या महिलेवर सपासप वार केले. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.