शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पराभवाच्या रागातून खूनाचा कट; सणसवाडी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 19:09 IST

शिक्रापुर पोलिसांची कारवाई, पाच जणांवर गुन्हा

कोरेगाव भिमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून काही युवकांनी एकाच्या खुनाचा कट रचून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूरपोलिसांनी खुनाचा कट रचणाऱ्या पराभूत महिलेवर देखील गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने मंगळवार पर्यंत (दि २३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अजय दरेकर व सागर दरेकर यांची आई कल्पना दरेकर यांचा रवींद्र दरेकर यांच्या वाहिनीने पराभव केला होता. या पराभवाच्या रागातुन कल्पना दरेकर या महिलेने तिची दोन मुले व त्यांच्या तीन साथीदारांनाबरोबर घेऊन रवींद्र दरेकर हे त्यांच्या सणसवाडी येथील कार्यालयात असताना अचानक अजय दरेकर, सागर दरेकर, सुजित दरेकर, मृणाल दरेकर, तुषार लांडगे आदींनी रवींद्र दरेकर याचे कार्यालयात जाऊन रवींद्र यास लाकडी दांडके, लोखंडी गज, पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली. यात रविंद्र बबन दरेकर (वय ३४, रा. प्रगतीनगर सणसवाडी ता. शिरूर जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस तपास करत असताना ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव पचनी न पडल्याने पराभूत महिला व तिची दोन मुले आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून खुनाचा कट रचून सर्व प्रकार केल्याचे समोर आले. पोलिसांनी कल्पना श्रीहरी दरेकर या महिलेवर देखील गुन्हा दाखल केला असून अजय श्रीहरी दरेकर, सागर श्रीहरी दरेकर, सुजित हिरामण दरेकर, मृणाल कैलास दरेकर, तुषार ज्ञानेश्वर लांडगे (सर्व रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक केली.....गंभीर गुन्हे करणारे होणार तडीपारशिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पुढील काळात कठोर कारवाई करून त्यांना शिरूर तालुक्यातून लवकर तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला