कालव्यात वाहत आलेल्या व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:19+5:302021-03-17T04:12:19+5:30

हडपसरमधील शिंदे वस्ती येथे कालव्यात वाहत आलेल्या मृत व्यक्तीचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करून ...

Murder of a person flowing in a canal | कालव्यात वाहत आलेल्या व्यक्तीचा खून

कालव्यात वाहत आलेल्या व्यक्तीचा खून

हडपसरमधील शिंदे वस्ती येथे कालव्यात वाहत आलेल्या मृत व्यक्तीचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करून संबंधीत व्यक्तीचा खून झाला असून, अज्ञाताविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल श्रीकृष्ण नेने (वय 45, रा. सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सिद्धार्थ नेने (वय 39) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, नेने यांना दारुचे व्यसन होते. त्यांच्या व्यसनाधिनतेमुळेच पाच वर्षांपूर्वी त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्यापासून विभक्त झाली होती. दरम्यान, नेने हे वाहन दुरुस्तीचे कामे करून उदरनिर्वाह करीत होते. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे ते घरी राहात नव्हते. त्यांना काही दिवसांपूर्वी नऱ्हे येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते. तर 11 मार्च रोजी ते संबंधित व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते. दरम्यान, सोमवारी दुपारी हडपसरमधील शिंदे वस्तीमध्ये कालव्यातून मृतदेह वाहत आल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या खुना होत्या. सुरूवातीला मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. तपास सुरू असतानाच संबंधीत मृतदेह राहूल नेने या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास करून नेने यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder of a person flowing in a canal