शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार करून तरुणाचा खून; वाघोली परिसरातील बकोरी रोडवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:14 IST

महेश डोके हा वाघोलीतील बीजीएस कॉलेज येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात वास्तव्यास होता....

पुणे : वाघोली परिसरातील बकोरी रोडवर एका तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. महेश डोके (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. महेश डोके हा वाघोलीतील बीजीएस कॉलेज येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात वास्तव्यास होता.

याप्रकरणी कृष्णकांत कमलेशकुमार यादव (वय ३०, रा. आरव ब्लीस सोसायटी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यादव हे मंगळवारी दुपारी घरी असताना, घराच्या खिडकीत बसून मोबाइल पाहत होते. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा एक तरुण हातात कोयता घेऊन दुसऱ्या तरुणाच्या मागे पळताना दिसला. समोर पळणाऱ्या तरुणाच्या अंगावर मोठे रक्त सांडलेले दिसले. त्यांनी खाली उतरून जोरात आवाज दिला. त्यावेळी कोयत्याने मारहाण करणारा तरुण दुचाकीवरून पळून गेला.

आरोपीने केलेल्या हल्ल्यात डोके गंभीर जखमी झाला होता. डोके याला खासगी रुग्णालयात दाखल केले. यादव यांना डोके याने आपले नाव सांगून, त्याच्या ओळखीतील एका व्यक्तीने आपल्याला मारल्याचे सांगितले. ससून रुग्णालयात डोके याला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डोके याचा खून करण्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

बकोरी रोड वाघोली येथे मंगळवारी दुपारी एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतरच खुनामागील कारण स्पष्ट होऊ शकेल.

- विश्वजित काईंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारी