शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: तब्बल २५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराचा पुणे कॅम्प परिसरात निर्घृण खून

By विवेक भुसे | Updated: January 13, 2024 12:04 IST

अरबाज शेख हा सराईत गुन्हेगार होता...

पुणे : खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अत्याचार, विनयभंग असे तब्बल २५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराचा कॅम्पात पहाटे टोळ्याने निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरबाज बबन शेख (रा. चुडामण तालीम, कॅम्प) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

अरबाज शेख हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्या नावावर अगदी खूनाचा प्रयत्न केल्यापासून जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे जवळपास २५ गुन्हे दाखल होते. त्याची कॅम्प परिसरात दहशत होती. त्याला एमपीडीएअंतर्गत कारवाई करुन कारागृहात स्थानबद्ध केले होते. त्यातून तो नुकताच सुटला होता. पोलीस नियंत्रण कक्षाला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॅम्पमधील खाऊ गल्लीत मारामारी सुरु असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा टोळके पळून गेले होते. एक तरुण निपचिप पडला होता. त्याला ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून त्यावरुन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी