सहजपूर येथे पुरुषाचा खून, ओळख पटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:11 IST2021-03-10T04:11:52+5:302021-03-10T04:11:52+5:30

सहजपुर (ता.दौंड) गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला खून करून टाकलेला एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी यवत पोलीसांनी पंचनामा ...

Murder of a man at Sahajpur, identity not known | सहजपूर येथे पुरुषाचा खून, ओळख पटेना

सहजपूर येथे पुरुषाचा खून, ओळख पटेना

सहजपुर (ता.दौंड) गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला खून करून टाकलेला एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी यवत पोलीसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी माहितीनुसार , सहजपुर गावाच्या हद्दीत जावजीबुवाचे मंदिराच्या मागे असलेल्या रस्त्यावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळाला. त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. मयत व्यक्तीला कशानेतरी मारहाण करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने रोडचे कडेला टाकून दिले मृताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून डोक्यावर काळे केस , दाढी पांढरी , मिशा बारीक , गळ्यात काळ्या रंगाचा धागा , उजव्या हाताच्या मनगटावर लाल पिवळ्या रंगाचा धागा , उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटात पिवळसर धातूची अंगठी आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a man at Sahajpur, identity not known