हॉटेल मध्ये बाचाबाचीच्या कारणावरून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST2021-09-13T04:09:17+5:302021-09-13T04:09:17+5:30

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६, व्यवसाय शेती, रा. किवळे, ता. खेड) व ...

Murder of a man due to an argument in a hotel | हॉटेल मध्ये बाचाबाचीच्या कारणावरून एकाचा खून

हॉटेल मध्ये बाचाबाचीच्या कारणावरून एकाचा खून

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६, व्यवसाय शेती, रा. किवळे, ता. खेड) व मयत

रमजान शेख, तसेच आरोपी रफिक शेख हे दि.११ रोजी दुपारी पाच वाजता शिवले याच्या मोटारसायकलवर ट्रिपलसीट चांदूस येथे जात होते. पाईट ते शिरोली रस्त्यावर एका पोल्ट्री फार्मदरम्यान रमजान शेख व रफिक शेख यांच्या हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून रफिक शेख याने धारदार हत्याराने रमजान शेख यांच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. गळ्याला गंभीर जखम झाल्याने रमजान शेख यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रफिक शेख चालत्या मोटरसायकलवरून उडी मारून पळून गेला. या घटनेबाबत चंद्रकांत सुदाम शिवले यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत रमजान शेख हा कुरकुंडी किवळे (ता. खेड) या परिसरात कोतवाल म्हणून कार्यरत होता. रफिक शेख हा फरार झाला असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहे.

Web Title: Murder of a man due to an argument in a hotel