खूनप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: August 31, 2014 01:07 IST2014-08-31T01:07:14+5:302014-08-31T01:07:14+5:30
तीक्ष्ण हत्यार डोक्यात घालून तरुणाचा खून करणा:या चौघांकडून पोलिसांनी कोयता व दुचाकी जप्त केली आहे.

खूनप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ
पुणो : तीक्ष्ण हत्यार डोक्यात घालून तरुणाचा खून करणा:या चौघांकडून पोलिसांनी कोयता व दुचाकी जप्त केली आहे. या चौघांची शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी चौघांची 2 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला. सुमित ऊर्फ सुमडय़ा सतीश गायकवाड (वय 22, रा. बोपखेल हनुमान मंदिराजवळ), रामानंद ऊर्फ राम्या प्रेमचंद साहनी (वय 2क्), दत्ता ऊर्फ दत्त्या प्रकाश पवार (वय 21, दोघे रा. साईनाथनगर जयहिंद चौक, वडगाव शेरी), जुबेर इकबाल शेख (वय 22, रा. खराडी) अशी आरोपींची नावे आहेत. जाकिर असगरअली शेख (वय 3क्, रा. बैंदवाडी, फुरसुंगी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ शहाबुद्दीन अजगरअली शेख (वय 5क्, रा. उन्नतीनगर, सोलापूर रस्ता) यांनी फिर्याद दिली. वडगाव शेरी येथील कुमार प्राईमवीरा सोसायटीसमोर 22 ऑगस्ट रोजी आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून शेखचा खून केला. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी हा गुन्हा का केला आहे, कोणाच्या सांगण्यावरून हा खून केला आहे का, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करायचे आहे, यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसाला तरुणांची दमदाटी
4वाहतूक नियमन करीत असलेल्या वाहतूक पोलिसाने अडवल्याचा राग धरुन तरुणांनी त्याची मोबाईलमध्ये छायाचित्रे काढून घेत मीडियाला बोलावण्याची धमकी दिली. या तरुणांनी अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केली. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंढव्यातील एबीसी फार्म चौकामध्ये घडली.
4अजित बाळासाहेब शितोळे (वय 28, रा. वडगाव शेरी), संदीप वीरेंद्र दुबे (वय 3क्, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. पिसाळ हे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एबीसी फार्म चौकामध्ये पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्यासह वाहतूक नियमन करीत होते. त्या वेळी दोन तरुण बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन जात होते. त्यांना पिसाळ यांनी अडवले. त्यांना अडवून कागदपत्रंची मागणी करीत असतानाच पाठीमागून मोटारीतून आरोपी आले. त्यांनी पिसाळ यांना अरेरावीची भाषा वापरत ‘‘आमच्या शो रुमच्या गाडय़ा अडवत जाऊ नका, तुम्हाला समजत नाही का, मी मीडियाला बोलावतो’’ असे म्हणून पिसाळ यांचा मोबाईलमध्ये फोटो काढून शासकीय कामात अडथळा आणला.