शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जडीबुटी औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या वडीलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 19:33 IST

वडील आणि मुलगा दारूच्या नशेत असल्याने किरकोळ मारहाणीत घडला हा प्रकार

केडगाव : पारगाव तालुका दौंड येथे जडीबुटी औषध निर्मिती करणाऱ्या मुलाने जन्मदात्या वडीलांचा खून केला. सदर घटना मंगळवार दिनांक २ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पारगाव तालुका दौंड येथील मुख्य चौकांमध्ये सदर जडीबुटी निर्मिती करणारे कुटुंब राहत होते.

गेल्या अनेक वर्षापासून जडीबुटी विकण्याचा व्यवसाय हे कुटुंब करत होते. यामध्ये वडील रतनसिंह नुरसिंह चितोडिया (वय ६९, सध्या रा.पारगाव, तालुका दौंड ) यांनी आपला मुलगा अजय रतनसिह चितोडिया (वय ४० वर्ष रा. पारगाव ,तालुका दौंड) याला पैसे मागितले.

परंतु मुलाने पैसे देण्यात नकार दिला. दोघे दारूच्या नशेत असल्याने वडिलांनी मुलाला किरकोळ मारहाण केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मुलाने वडिलांना पुन्हा लाकडाच्या साहाय्याने मारहाण केली. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते.

टॅग्स :daund-acदौंडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक