शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

कचरा प्रक्रियेसाठी पालिकेचे अतिरिक्त सव्वा कोटी खर्ची पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 20:55 IST

कचऱ्यावर पालिकेचे प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत तीन-चार महिन्यासाठी काम देण्याचा निर्णय..

ठळक मुद्देअतिवृष्टी व निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कारणास्तव पालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प होते अपूर्ण संबंधित कंपनीने प्रत्येक टनामागे ६४६ रुपये टिपिंग मागितली फी 

पुणे : महापालिकेचे शहरातील चार कचरा प्रक्रिया प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने, अतिरिक्त दर देऊन ठेकेदार कंपनीमार्फत कचऱ्यावर प्रक्रिया करून घेण्याची वेळ आली आहे. यामुळे पालिकेला कचरा प्रक्रियेसाठी टनामागे १७५ रूपये अधिकचा दर द्यावा लागणार आहे. यापोटी पालिकेचे सुमारे सव्वा कोटी रूपये खर्ची पडणार आहेत. उरूळी देवाची कचराडेपो येथे डिसेंबर,२०१९ नंतर कचरा टाकण्यात येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने हरित लवादाला दिले होते. तसेच शहरात एक हजार टन क्षमतेचे चार कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून त्याठिकाणी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टी व निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कारणास्तव पालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाले नाही. त्यातच १ जानेवारीपासून येथे कचरा टाकण्याची मुदत संपल्याने उरूळी देवाची कचरा डेपोवर जाणाऱ्या ४०० ते ५०० टन कचरा प्रक्रियेशिवाय शहरात साठू लागला होता.यामुळे पालिकेने आत्तापर्यंत सर्वाधिक कचरा प्रक्रियेचे काम ज्या कंपनीला दिले. त्या भूमी ग्रीन कंपनीलाच या कचऱ्यावर पालिकेचे प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत तीन-चार महिन्यासाठी काम देण्याचा निर्णय घेतला. यानुसार बायोमायनियंगचा ७०० टन कचरा व शहरात गोळा होणाऱ्या ४०० टन कचवर प्रकियेकरिताचे काम त्यांना देण्याचे निश्चित झाले असताना, संबंधित कंपनीने प्रत्येक टनामागे ६४६ रुपये टिपिंग फी मागितली आहे. साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असल्याने, पालिका प्रशासनाने त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. पूर्वी संबंधित कंपनीला हीच फी ४७१ रूपये इतकी देण्यात येत होती. मात्र, आता नवीन दरामुळे पालिकेवर अंदाजे सव्वा कोटीचा अतिरिक्त भार पडणार आहे.

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका