कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडे पुरेशी साधनसामग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:47+5:302021-04-01T04:12:47+5:30

पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुणे महापालिकेला शहरातील स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत झाली आहे. सहा सात ...

The municipality has adequate equipment for the funeral of the person who died due to corona | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडे पुरेशी साधनसामग्री

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडे पुरेशी साधनसामग्री

पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुणे महापालिकेला शहरातील स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत झाली आहे. सहा सात संस्थांचे प्रत्येकी २० ते २५ प्रतिनिधी याकरिता गेली वर्षभर शहरातील विविध स्मशानभूमीत, दफनभूमीत कार्यरत आहेत़

सदर सेवकांना महापालिकेने आत्तापर्यंत ७ हजार ४१७ पीपीई किट, १२ हजार ५१२ हॅण्ड ग्लोज, १ हजार ८९५ एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क व सॅनिटायझर पुरविले आहेत़ तसेच या संस्थांनाही अनेकांना शहरात स्वत:हून या साहित्यांचा पुरवठा केला आहे़ यामुळे शहरात कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींनाही आजपर्यंत कोरोना संरक्षण किटचा पुरवठा कमी झाल्याची तक्रार आलेली नाही़

पुणे महापालिका आपल्या तथा शासनाच्या शववाहिकेतून कोरोनाबाधितांचे मृतदेह स्मशानभूमी अथवा दफनभूमीपर्यंत पोहचविताना, सदर शववाहिकेतील चालक व सहकाऱ्यास प्रत्येक वेळी नवे पीपीई किट वापरण्याचे बंधनकारक करीत आली आहे़ महापालिकेच्या आरोग्य विभागातून हे पीपीई किट शववाहिका चालकांनी दररोज घ्यावेत, अशा सूचनाच आरोग्य विभागाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत़ यामुळे दिवसाला साधारणत: १५० पीपीई किट शहरात अंत्यविधीसाठी वापरले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे़

---

शहरातील एकूण कोरोनाबाधित संख्या - २ लाख ६९ हजार ३४३

बरे झालेले रुग्ण - २ लाख ३० हजार १८३

उपचार सुरू -३० हजार ८५८

कोरोनाबळी -५ हजार ३०२

---

कोट :-

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हाताळताना संबंधित व्यक्तींना पीपीई किटचा पुरवठा वेळेत होईल याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे़ या कामात स्वयंसेवी संस्थांचाही मोठा पुढाकार राहिला आहे़

- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी

Web Title: The municipality has adequate equipment for the funeral of the person who died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.