शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका ‘मुठ्ठी में’; ७०६ कोटी थकवण्याची ‘आयडिया’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:03 IST

शहरातील विविध मोबाईल कंपन्यांकडे महापालिकेची तब्बल ७०६ कोटी रुपयांची थकबाकी असून, या बड्या थकबाकीदार कंपन्यांनीच आता महापालिकेकडे रस्ते खोदाई करण्याची परवानगी मागितली आहे.

पुणे : शहरातील विविध मोबाईल कंपन्यांकडे महापालिकेची तब्बल ७०६ कोटी रुपयांची थकबाकी असून, या बड्या थकबाकीदार कंपन्यांनीच आता महापालिकेकडे रस्ते खोदाई करण्याची परवानगी मागितली आहे. थकबाकी भरल्याशिवाय परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वरिष्ठ अधिकारी या निर्णयावर ठाम राहिल्यास महापालिकेच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास चांगलाच हातभार लागू शकतो.शहरामध्ये एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स जिओ, रिलायन्स इन्फ्रा, टाटा टेलिसर्व्हिसेस, भारत संचार निगम आदी १९ मोबाईल कंपन्यांकडून शहराच्या विविध भागांत तब्बल २ हजार ३१२ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या मोबाईल टॉवरसाठी संबंधित कंपन्यांकडून कर आवश्यक आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मोबाईल कंपन्यांनी करच भरला नसून, सध्या तब्बल ७०६ कोटी ७९ लाख एवढी मोठी थकबाकी आहे. गेल्या वर्षभरामध्ये संबंधित कंपन्यांकडून ३४ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी महापालिकेने वसूल केली आहे.रस्ते खोदाईसाठी महापालिकेने स्वतंत्र धोरण आणले असून, शहर सुधारणा समितीच्या बैठकीत हे धोरण मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. परंतु रस्ते खोदाईचे धोरण मंजूर नसताना महापालिकेच्या मुख्य सभेने मोबाईल कंपन्यांना ओपन ट्रेचिंग रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.‘‘विविध मोबाईल कंपन्यांकडून सुमारे २०० किलोमीटरचे रस्ते खोदाईसाठी अर्ज आले आहेत. परंतु संबंधित मोबाईल कंपन्यांना थकबाकी भरल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही. महापालिकेच्या कर विभागाची एनओसी दाखल केल्यानंतरच रस्ते खोदाईला परवानगी देण्यात येईल’’, असे पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.>थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरूमोबाईल कंपन्यांकडे गेल्या सहा-सात वर्षांपासून ७०६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीसंदर्भांत अनेक मोबाईल कंपन्यां न्यायालयात गेल्या आहेत. परंतु आता थकबाकी भरल्याशिवाय रस्ते खोदाईला परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याने वसुली होईल अशी अपेक्षा आहे.- विलास कानडे,सह महापालिका आयुक्त, कर विभाग

टॅग्स :Puneपुणे