सीएनजी किट घेण्यासाठी १२०० रिक्षांना पालिकेचे अनुदान
By Admin | Updated: July 11, 2015 05:08 IST2015-07-11T05:08:46+5:302015-07-11T05:08:46+5:30
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घ्यावे, याकरिता महापालिकेच्या वतीने १,२०० रिक्षाचालकांना १ कोटी ४४ लाख

सीएनजी किट घेण्यासाठी १२०० रिक्षांना पालिकेचे अनुदान
पुणे : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घ्यावे, याकरिता महापालिकेच्या वतीने १,२०० रिक्षाचालकांना १ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत २०११ पासून २० कोटी रुपयांच्या अनुदानाचे रिक्षाचालकांना वाटप करण्यात आले आहे.
शहरामध्ये ४५ हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवावे, याकरिता महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन दिले जात आहे. पालिकेच्या वतीने २०११-१२पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ हजार रिक्षाचालकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
यंदा रिक्षाचालकांच्या अनुदानामध्ये निम्म्याने कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी २ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद सीएनजी किट अनुदानासाठी करण्यात आली होती. रिक्षाचालकांना सीएनजी किटसाठी रिक्षा परवाना, आरसी बुक, आरटीओची मान्यता, सीएनजी किट बसविल्याची पावती आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
वर्षरिक्षांची अनुदान
संख्या
२०११-१२१६६०२ कोटी
२०१२-१३८७३९१२ कोटी
२०१३-१४१६५०२ कोटी
२०१४-१५२१६१२.६० कोटी
२०१५-१६१२००१. ४४ कोटी
(प्रतिनिधी)