शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'पीएमआरडीए' कडून विकसन शुल्काचे तीनशे कोटी मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:54 IST

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पुणे महापालिकेकडून आपल्या तिजोरीत कशी भर पडेल यासाठी सतत प्रयत्न सुरू..

ठळक मुद्देमहसुल समितीची स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुणे : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पुणे महापालिकेकडून आपल्या तिजोरीत कशी भर पडेल यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, याचाच एक भाग म्हणून महापालिकेने आता आपला मोर्चा पीएमआरडीए कडे वळविला आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 'पीएमआरडीए' कुठलीही कामे करत नाही. त्यामुळे येथील बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात आलेले सुमारे ३०० कोटी रूपयांचे विकसन शुल्क महापालिकेला द्यावे, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे़     महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या महसुल समितीची बैठक स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. या बैठकीत महापालिकेच्या हद्दीत जी अकरा गावे समाविष्ट झाली आहेत. त्या गावांमधील बांधकामांना 'पीएमआरडीए' (पुणे क्षेत्र महानगर विकास प्राधिकरण) मान्यता देताना विकसन शुल्क वसुल केले आहे. परंतु, ही गावे आता महापािलकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारची कामे पीएमआरडीएकडून केली जात नसल्याने, या बांधकाम परवानगी देताना वसुल केलेले सुमारे तीनशे कोटी रुपये विकसन शुल्क पीएमआरडीएने महापालिकेला दिले पाहिजे अशी भुमिका मांडण्यात आली. तसेच हे शुल्क पीएमआरडीएकडून मिळावे यासाठी पाठपुरावा करावा असा निर्णय घेण्यात आला.     याचबरोबर महापालिकेचा मुख्य उत्पन्न स्त्रोत असलेल्या मिळकत विभागाला कर लागू न झालेल्या मालमत्ता शोधून काढण्यासाठी अतिरिक्त अडीचशे कर्मचारी पुरविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सद्यस्थितीला मिळकत करातून पालिकेच्या तिजोरीत ४८० कोटी रुपए जमा झाले असल्याने, गतवर्षीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी, कर भरणा सवलतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कर जुलै अखेरपर्यंत गोळा करून गतवर्षीच्या तलुनेत कमी आलेले ३२० कोटींचे उत्पन्न मिळवावे असेही कर विभागास सांगण्यात आले.     राज्य सरकारकडे मुद्रांक शुल्कातील महापालिकेच्या वाट्याचे थकित असलेले सुमारे १४४ कोटी रुपये मिळविण्याबरोबरच, मालमत्ता विभागाकडील ओपन स्पेसचा व्यावसायिक वापर, सदनिकांची विक्री प्रक्रिया राबवावी अशा सूचना यावेळी प्रशासनास देण्यात आल्याचे हेमंत रासणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस