शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाड्यांच्या विकासात महापालिकेची गडबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 12:37 IST

पुण्याच्या मध्यभागात अनेक वाडे आहेत. क्षेत्रफळ लहान असल्याने त्यांच्या विकसनात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देगलिच्छ वस्ती घोषित करून एसआरए योजना वाड्यांच्या विकसनासाठी राज्य सरकारच्या संमतीने धोरण निर्मितीची तयारी महापालिका प्रशासनाचा राज्य सरकारला क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव

पुणे : शहरातील जुन्या वाड्यांच्या विकासासाठी त्यांना गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर केले जात असून यात बांधकाम व्यावसायिकांचा हात असल्याची चर्चा आहे. वाड्यांच्या विकसनासाठी राज्य सरकारच्या संमतीने धोरण तयार करण्यात येत असून तत्पुर्वीच महापालिकेचे अधिकारी व काही बांधकाम व्यावसायिक संगनमताने या वाड्यांच्या जागेचा व्यवहार करत आहेत.पुण्याच्या मध्यभागात अनेक वाडे आहेत. क्षेत्रफळ लहान असल्याने त्यांच्या विकसनात अडचणी येत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव पाठवला होता. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक विशाल धनवडे यांनी या विषयावर सातत्याने सभागृहात विचारणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ठाणे शहरात राबवले तेच धोरण पुणे शहरात राबवावे असे सांगितले. त्यासाठी तिथे सर्वेक्षणाचे काम करणाºया संस्थेलाच पुणे शहराच्याही सर्वेक्षणाचे काम देण्यात आले.हे काम पुर्ण होऊन संबधित संस्थेने अहवालही सादर केला आहे. मात्र त्याआधीच शहरात काही वाड्यांचे व्यवहार होत आहेत असा आरोप नगरसेवक विशाल धनवडे यांनी केला आहे. काही बांधकाम व्यावसायिक महापालिका प्रशासनाला हाताशी धरून हे करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शहरातील काही वाडे त्यांनी याचप्रकारे एसआरए म्हणून घोषीत केले असल्याची माहिती त्यांनी दिली. कायद्याप्रमाणे कोणत्याही वाड्याला गलिच्छ वस्ती म्हणून घोषीत करता येत नाही, मात्र असे प्रकार वाढले आहेत, त्यात महापालिकेचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे धनवडे यांनी सांगितले.  महापालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मुलन विभागाकडून ज्या वाड्याच्या विकासनाचे काम करायचे आहे त्या वाड्याची पाहणी केली जाते. जुन्या वाड्यांमध्ये सर्व घरांना मिळून एक अथवा दोन सार्वजनिक शौचालये, नळकोंडाळे असते. त्याचाच आधार घेत एखादा वाडा गलिच्छ वस्ती म्हणून घोषीत केला जातो. तो अहवाल माहिती झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणला दिली जाते. त्यांच्याकडून लगेचच त्या जागेवर एसआरए योजना जाहीर केली जाते. बांधकाम व्यावसायिक येऊन त्यात सहभाग दर्शवतो व तो वाडा ताब्यात घेतो. जुन्या भाडेकरूंना हलवले जाते किंवा जागा दिली जाते व तिथे इमारती उभ्या राहतात. महापालिकेला ना विकास शुल्क मिळते ना कसली जागा अशी माहिती धनावडे यांनी दिली. .................महापालिकेची मालकी असलेल्या काही जागांवरही आता एसआरए योजना राबवली जात आहे असे धनावडे म्हणाले. या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

................... 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार