बिबवेवाडी येथे महापालिकेच्या मोहिमेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:19+5:302021-03-04T04:18:19+5:30
ही लस घेण्याकरिता ४५ ते ६० वयोमर्यादा असलेल्या नागरिकांनी मोबाईल व संगणकावरून नावनोंदणी केली होती. अनेक नागरिकांनी लस घेण्याकरिता ...

बिबवेवाडी येथे महापालिकेच्या मोहिमेस सुरुवात
ही लस घेण्याकरिता ४५ ते ६० वयोमर्यादा असलेल्या नागरिकांनी मोबाईल व संगणकावरून नावनोंदणी केली होती. अनेक नागरिकांनी लस घेण्याकरिता केलेल्या नावनोंदणीची प्रत बरोबर घेऊन आले होते. तर काही नागरिक थेट जाऊन लस घेण्यासाठी रांगेत बसले होते. सर्वांना कोविशिल्ड ही लस देण्यात येणार असून लस घेतल्यानंतर नागरिकांना किमान अर्धा तास तरी निरिक्षणासाठी लसीकरण केंद्रात थांबावे लागणार असून त्यासाठी नागरिकांना बसण्याची सोय देखील करण्यात आली होती. ही मोहीम सुरू करण्याआधी महापालिके तर्फे या दवाखान्यांमध्ये ड्रायरन करून चाचणी करण्यात आली होती.
लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत असून ही लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा एकदा दुसरी लस घ्यावी लागणार आहे. लसीकरण केंद्रे महापालिकेच्या शाळेमध्ये सुरू करण्यात यावी अशी देखील नागरिक मागणी करत आहे.
................................................................................
फोटो ओळ:- बिबवेवाडी येथे महापालिकेच्या स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखान्यात कोविड लसीकरण करण्यास सुरुवात झाली त्यावेळी नागरिकांनी रांगेत बसून प्रतीक्षा केली.