शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

पालिकेचे पुरस्कार अजूनही रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:01 AM

सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी : प्रमुख पाहुण्यांवर अडली गाडी

पुणे : कोणत्यातरी महापालिकेत झालेल्या उधळपट्टीनंतर न्यायालयाने निर्देश दिल्याने रखडलेले महापालिकेचे पुरस्कार त्यातील तरतुदींकडे लक्ष वेधल्यानंतर सुरू करणार असल्याची घोषणा झाली खरी, मात्र आता पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे कोण, यावरून ते अडलेले आहेत. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई विभागातील एका महापालिकेने दर आठवड्याला पुरस्कार जाहीर करून त्यांच्या वितरणाच्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू केली. त्याला एका याचिकेमुळे न्यायालयाने लगाम घातला. राज्य सरकारनेही त्याची दखल घेत सर्व महापालिकांना पुरस्कारावर खर्च करता येणार नाही, असे पत्रक पाठवले. त्याचाच आधार घेत महापालिकेने गेली अनेक वर्षे सुरू असलेले त्यांचे विविध मान्यवरांच्या नावाचे पुरस्कार एकदम बंद करून टाकले. तत्पूर्वी काही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यांचे वितरण थांबवण्यात आले होते.‘लोकमत’ने सर्वप्रथम या हडेलहप्पीवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी याचा वारंवार पाठपुरावा केला. शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातूनही महापालिकेवर दबाव आला व पुरस्कारांची रक्कम न देता मानपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. मात्र आता त्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे कोणाला बोलवायचे यावरून वादावादी सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात तर हे मतभेद आहेतच; शिवाय सत्ताधाऱ्यांमधीलही दोन गटांमध्ये पाहुणा आमचाच हवा, असा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे निर्णय होऊनही हे पुरस्कार अजून रखडलेलेच आहेत.पुरस्कार ही स्थानिक स्वराज्य संस्थेने संबधितांच्या पाठीवर मारलेली थाप असती. तो पुणेकरांनी केलेला गौरव असतो. पुरस्कार विजेत्याला रकमेचे महत्त्व नसते तर हा गौरव महत्त्वाचा असतो. तो मानपत्र देऊन करायचा हे ठरल्यानंतरही असे वाद होत असतील तर ते योग्य नाही, असे मत बागुल यांनी यावर बोलताना व्यक्त केले. प्रत्येक वेळी तारीख दिली जाते. मागील वर्षीचे पुरस्कारही रखडलेले आहेतच. त्यात आता यावर्षींच्या पुरस्कारांची भर पडेल. त्यानंतर मग एकापाठोपाठ एक किंवा एकाच वेळी दोन-तीन पुरस्कारांचे वितरण अशा पद्धतीने कार्यक्रम घेतले जातील, हे योग्य नाही. त्यामुळे याबाबतीत महापालिकेने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी बागुल यांनी केली.नावाचा अपमान होतोयभीमसेन जोशी, बालगंधर्व,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रोहिणी भाटे, संताजी जगनाडेमहाराज अशा विविध महनियांच्या नावे महापालिका दरवर्षी एकूण १७ पुरस्कार देत असते. कार्यक्रम रखडवल्यामुळे या नावांचे ज्यांना पुरस्कार जाहीर झाले त्यांचा व खुद्द महापालिकेच्याही नावाचा अवमान होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर पुरस्कारांचे वितरण करावे, असे मत बागुल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcultureसांस्कृतिक